Tur Kharedi : राज्यातील तूर उत्पादक (Tur Growers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारनेतूर खरेदीच्या (Tur Kharedi) मुदतीत वाढ करत आता २८ मेपर्यंत हमीभावाने तूर विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. (Tur Kharedi)
शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर केंद्राच्या कृषी मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून, उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर आता हमीभावाने विक्री करता येणार आहे. (Tur Kharedi)
राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तूर खरेदीसाठी आता २८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हमीभावाने तूर विक्री करू न शकलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Tur Kharedi)
ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही तूर विक्री केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या खरेदी केंद्रावर संपर्क करून तूर हमीभावाने विकावी. ही मुदत वाढ ही शेवटची संधी मानली जात असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. (Tur Kharedi)
शेतकऱ्यांच्या मागणीला यश
राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी तूर खरेदीची मुदत वाढवावी, अशी मागणी सातत्याने केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याची दखल घेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तूर खरेदीसाठी अतिरिक्त मुदत जाहीर केली आहे.
तूर खरेदीची आतापर्यंतची स्थिती
* राज्यात एकूण १ लाख ३७ हजार ४५८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली.
* त्यापैकी ६९ हजार १८९ शेतकऱ्यांकडून १ लाख ०२ हजार ९५१ मेट्रिक टन तूर खरेदी झाली.
* तूर खरेदीची ९० दिवसांची मुदत १३ मे रोजी संपली होती.
* उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर अद्याप खरेदी झालेली नाही.
खरेदी केंद्रांची माहिती
* केंद्र सरकारने राज्यासाठी २ लाख ९७ हजार ४३० मेट्रिक टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
* नाफेड व एनसीसीएफ या नोडल संस्थांमार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे.
* राज्यातील ८ राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत ७६४ खरेदी केंद्रे कार्यरत आहेत.
महत्त्वाची माहिती
मुद्दा | माहिती |
---|---|
पूर्वीची अंतिम तारीख | १३ मे २०२५ |
नव्याने जाहीर केलेली अंतिम तारीख | २८ मे २०२५ |
हमीभाव | ७,५५० रुपये प्रति क्विंटल |
शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत तूर खरेदीसाठी २८ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. - जयकुमार रावल, पणन मंत्री