Join us

Tur Kharedi : हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी ३० दिवसांची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:34 IST

हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दि. २४ जानेवारी २०२५ पासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते.

हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दि. २४ जानेवारी २०२५ पासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते.

ही मुदत आणखी ३० दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

दि. २४ फेब्रुवारी २०२५ अखेर राज्यात २९ हजार २५४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १६१ शेतकऱ्यांकडून १८१३.८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

उर्वरित शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.

टॅग्स :तूरपीकशेतकरीशेतीबाजारराज्य सरकारसरकारजयकुमार रावल