Join us

थरांची हायड्रोपोनिक शेती करताय? हे तीन प्रकार माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 18:57 IST

हवामान बदल आणि वाढत्या तापमानामुळे शेतीमध्ये बदल करावे लागत असून अनेक शेतकरी पॉलिहाऊस, शेडनेट आणि  ग्रीनहाऊसचा अवलंब शेतीमध्ये करत आहेत.

भारतीय शेती पद्धतीमध्ये दिवसेंदिवस बदल होत चालला आहे. हवामान बदल आणि वाढत्या तापमानामुळे शेतीमध्ये बदल करावे लागत असून अनेक शेतकरी पॉलिहाऊस, शेडनेट आणि  ग्रीनहाऊसचा अवलंब शेतीमध्ये करत आहेत. याच शेतीपद्धतीला संरक्षित शेतीपद्धती असेही म्हणतात. 

त्याचबरोबर लेअर फार्मिंग म्हणजे थरांची शेती सुद्धा मागच्या अनेक वर्षांपासून केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे कमी जागा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी लेयर फार्मिंग म्हणजेच थरांच्या शेतीचा अवलंब केला असून यामध्ये तीन ते चार पट जास्त उत्पादन घेता येऊ शकते. 

ही जरी खर्चिक बाब असली तरी उत्पन्न वाढत असल्यामुळे शेतकरी या पद्धतीचा वापर करत असून वेगवेगळ्या प्रदेशानुसार आणि बदलत्या हवामानानुसार थरांच्या शेतीमध्ये किंवा थरांच्या डिझाईन मध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. 

हवेतील आद्रतेच्या प्रमाणावर या वेगवेगळ्या डिझाईन बनवण्यात आलेल्या आहेत. ज्या प्रदेशामध्ये हवेतील आर्द्रता कमी असते त्या प्रदेशांमध्ये दोन थरातील अंतर कमी ठेवले जाते. त्याचबरोबर ज्या प्रदेशांमध्ये हवेतील आर्द्रता ही ६५ टक्के पेक्षा कमी असते अशा भागांमध्ये दोन थरांतील अंतर जास्त ठेवले जाते. ज्या परिसरातील आर्द्रता ही खूप जास्त म्हणजे ९०% च्या आसपास असते अशा परिसरामध्ये दोन थरातील अंतर हे जास्त ठेवावे लागते. 

हवेच्या आद्रतेनुसार थरातील अंतर कमी जास्त होते. परंतु, या तीनही डिझाईन मध्ये पिकाचे उत्पादन सारखेच येते. फक्त हवा खेळती रहावी आणि पिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे तीन वेगवेगळे डिझाईन आपण थरांच्या शेती मध्ये वापरू शकतो.

माहिती संदर्भ - प्रिया देवकर (लेअर फार्मिंग करणाऱ्या शेतकरी)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी