Join us

यंदा मका अन चणा पिकाचे क्षेत्र वाढणार, शेतकरी व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 11:08 IST

६५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाचे नियोजन : पुरेशा पिकांना दिलासा

यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात यंदा 'कहीं खुशी, कहीं गम अशी परिस्थिती असताना आता शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज झाला आहे. यंदा एकूण ६५ हेक्टरमध्ये रब्बी पिकाची लागवड केली जाणार आहे. त्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी हरभरा व मका पिकाला अधिक पसंती दिली असल्याने या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कृषी विभागानेही खताचे नियोजन केले आहे. यंदा मका व हरभरा पिकाचे क्षेत्र वाढणार असून शेतकरी व्यस्त झाले आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. मात्र खरीप हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. रबी हंगामात धान कमी प्रमाणात असतो. भाजीपाला व कडधान्य पिकावर भर दिला जातो.

१० हजार हेक्टर क्षेत्रात राहणार भाजीपाला

  • जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात नेहमीच  भाजीपाला लागवडीकडे लक्ष केंद्रीत करीत आला आहे. यंदाच्या रब्बी हंगामात १० हजार हेक्टर क्षेत्रात भाजीपाला पिकाची लागवड केली जाणार आहे. याची तयारी सुरु आहे.
  • यात आरमोरी व चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १५०० हेक्टर क्षेत्रावर त्यापाठोपाठ सिरोंचा, गडचिरोली, कुरखेडा, देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक भाजीपाला लागवडीचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे.

अशी होणार पीकनिहाय पेरणी

जिल्ह्यात यावर्षी गहू एक हजार हेक्टर, ७३८० हेक्टर, रब्बी ज्वारी २२६० हेक्टर, मका १० हजार हेक्टर, करडई १२०० हेक्टर, जवस २२१० हेक्टर, हरभरा ७३८० हेक्टर, लाखोळी ६८२५ हेक्टर, मसूर १२०० हेक्टर, भुईमूग ५६० हेक्टर, करडई १२०० हेक्टर तर इतर रब्बी पिके १३ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात नियोजित करण्यात आली आहे. यानुसार पिकांची पेरणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :शेतकरीकाढणीगडचिरोली