Join us

यंदा परदेश अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील १२० शेतकरी जाणार; जीआर आला, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:23 IST

सन २०२४-२५ मध्ये "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देवून सदर बाबीकरीता रु. १४०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी चाळीस लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात/कृषि मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषि माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर/शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे.

विविध देशांनी विकसीत शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन तसेच क्षेत्रिय भेटी, संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात. तद्नुसार सन २००४-२००५ पासून सदर योजना सुरु आहे.

"राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" ही योजना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात राबविण्याकरीता १२० शेतकरी व ६ अधिकारी यांच्या परदेश दौऱ्याकरीता रु. १४०.०० लक्ष एवढ्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

तथापि काही तांत्रिक कारणांमुळे व कमी कालावधीमुळे सदर अभ्यास दौरा सन २०२३-२४ मध्ये आयोजित झाला नसल्याने तो चालू वित्तीय वर्ष सन २०२४-२५ या वर्षाकरीता निधी मागणी व योजना राबविणेस शासन मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी संदर्भाधीन पत्रान्वये शासनास सादर केला होता.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता रु. २००.०० लाख (रुपये दोन कोटी फक्त) इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सन २०२४-२५ मध्ये "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देवून सदर बाबीकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

सन २०२४-२५ मध्ये "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेंतर्गत १२० शेतकरी व ६ अधिकारी यांच्या परदेश दौऱ्याकरिता रु. १४०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी चाळीस लक्ष फक्त) एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर बाबीकरीता रु. १४०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी चाळीस लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीबाजारराज्य सरकारसरकार