Join us

Solar Pannel : सौरउर्जेवर चालणार गावे! 'रूफटॉफ सोलार मॉडेल व्हिलेज' होणार विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:10 IST

जिल्ह्यात ५,००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली चौदा गावे लवकरच 'रूफटॉप सोलार मॉडेल व्हिलेज' म्हणून घोषित केली जाणार आहेत.

Hingoli : जिल्ह्यात ५,००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली चौदा गावे लवकरच 'रूफटॉप सोलार मॉडेल व्हिलेज' म्हणून घोषित केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. पंतप्रधान सूर्य घर मोफत योजनेचा आढावा २६ जून रोजी गुप्ता यांनी घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

या उपक्रमांतर्गत, संबंधित गावांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे हरित ऊर्जा वापरामध्ये जिल्ह्याची मोठी कामगिरी ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

या आढावा बैठकील्ली महावितरणचे. अधीक्षक अभियंता आर. एस. चव्हाण, शिखर बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड, महावितरणचे उपविभागीय अभियंता देशमुख, सरपंच पिसे आदींसह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

प्रोत्साहन देणाऱ्यास १ हजार रुपयेया योजनेंतर्गत जी व्यक्ती एखाद्या घराला सौर ऊर्जेवर आणण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि तिचा संदर्भ सोलर अॅप्लिकेशनमध्ये टाकेल, त्या व्यक्तीला १,००० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता आर.एस. चव्हाण यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वीज वितरणच्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली.

कोट्यवधी रुपयांचे अनुदानजी गावे शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणारी होतील, त्या गावांना केंद्र शासनाकडून १ कोटी रुपयांचे अनुदान मिळेल. या अनुदानातून घरगुती सौर ऊर्जा प्रणाली, पथदिवे, सौर पंप, शासकीय इमारतींवरील सोलार पॅनल इत्यादी कामे हाती घेतली जातील, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले. महावितरण आणि महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांनी या कामात पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींना सहकार्य करावे आणि गावात जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी