दीपक दुपारगुडेसोलापूर : पूर्वी उन्हाळा सुरू होताच अनेक कुटुंबांत वर्षभराचे धान्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करून पत्र्याच्या कोठ्यांमध्ये साठवले जाई. परंतु सध्या काळानुरूप या साठवणुकीच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे.
पारंपरिक पत्र्याच्या कोठ्यांऐवजी आता प्लास्टिकचे एअरटाईट ड्रम, स्टील डबे, फूड ग्रेड कंटेनर यांचा अधिक वापर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पूर्वीची कोठी ही पत्र्याची, आतील बाजूस वारंवार कोळसा, राख किंवा नील वापरून स्वच्छ केली जाई. तरीही धान्यात कीड, बुरशी, वास यांची शक्यता असे.
आता बहुतेक गृहिणी आणि किराणा दुकानदार साठवणीसाठी फूड ग्रेड एअरटाईट प्लास्टिक ड्रम, क्लिपबंद प्लास्टिक डबे किंवा झिपबॅग्स यांचा वापर करत आहेत.
यामुळे आर्द्रतेपासून संरक्षण होते आणि धान्य अधिक काळ टिकते. शहरी भागांमध्ये स्वयंपाकघर लहान असल्याने जागेचा विचार करून मध्यम आकाराचे स्टॅकेबल डबे पसंत केले जात आहेत.
तर ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी पत्र्याच्या कोठ्या वापरल्या जातात; मात्र त्यातही प्लास्टिक ड्रममध्ये धान्य भरून ठेवले जात असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
अधिक फायदेशीर ठरतेसध्याची ही बदलती साठवणूक प्रणाली आरोग्याच्यादृष्टीने आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरत आहे. मात्र, खर्च वाढल्याने सर्वापर्यंत ही पद्धत पोहोचलेली नाही, असे मारुती जाधव यांनी सांगितले.
आधुनिक साठवणूक पद्धतीचे फायदे- एअरटाईट डब्यांमुळे कीड अन् बुरशीपासून संरक्षण.- फूड ग्रेड प्लास्टिक वापरल्यास आरोग्यास सुरक्षित.- हाताळायला सोपे आणि जागा वाचवणारे.- शुद्ध धान्य दीर्घकाळ टिकवता येते.
बदलते साठवणूक साधनआधी वापरले जाणारे - सध्या वापरले जाणारे पत्र्याच्या कोठ्या प्लास्टिक ड्रम - फूड ग्रेडगोणपाट पोती क्लिपबंद डबे - झिपबॅगलाकडी पेट्या - स्टील कंटेनर
अधिक वाचा: शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर