भारतीय शेती पद्धतीमध्ये कडधान्याला विशेष महत्त्व आहे मात्र यामध्ये सर्वाधिक पौष्टिक असणारे कुळीथ हे पीक दुर्लक्षित राहिले आहे. काही ठिकाणी बोली भाषेनुसार याला हुलगा असे देखील संबोधले जाते. कमी पाण्यात, कमी वेळेत व कमी अन्नद्रव्याच्या उपलब्धतेमध्ये येणारे कडधान्य आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आरोग्यवर्धक आहे. कोकणात कुळीथाला प्रचंड महत्त्व आहे. कुळीथाची पिठी कोकणात प्रसिद्ध आहे.
कुळीथाचे फायदे1. कुळीथामध्ये फायबर व प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.2. कुळीथ हे फार काळ राहणाऱ्या तापावर गुणकारी औषध आहे. 3. कुळीथाचा उपयोग दमा नियंत्रणात आणण्यासाठी व अस्थमा असणाऱ्या लोकांची प्रतिकारक्षमता वाढवण्यास केला जातो.4. या कडधान्याचे पीठ चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तजेल व टवटवीत राहते. 5. कुळीथाच्या सेवनामुळे महिलांना मासिक पाळीत होणारे त्रास कमी होऊ शकतात. 6. कुळीथ हे मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. 7. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक गुणधर्मामुळे चरबी बर्नर म्हणून उपयोग होतो आणि एलडीएल ( खराब कोलेस्ट्रॉल) कमी करू शकतात.8. शरीरातील बद्धकोष्ठता दूर करण्यास कुळीथाचा उपयोग होतो. 9. कुळीथाचं कढण वातनाशक असून जेवणात रुची उत्पन्न करणार आहे. 10. कुळीथाच्या काढ्यानं लघवी साफ होते. - प्रविण सरवळे (आचार्य पदवी विद्यार्थी) - 9767838165- डॉ. व्हि. जी. मोरे (सहयोगी प्राध्यापक)- डॉ. व्हि. ए. राजेमहाडिक (सहाय्यक प्राध्यापक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी)