Join us
Daily Top 2Weekly Top 5

युरियाच्या पोत्याचा आकार कमी होणार; आता किती किलोचे येणार पोते? काय राहणार किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:17 IST

Urea Khat Kimmat संतुलित खत वापराला चालना देण्यासाठी आणि जमिनीचा कस सुधारण्यासाठी एक धोरणात्मक उपाय म्हणून युरियाच्या गोणीचा आकार कमी करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, युरियाच्या किमतीत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही त्यामुळे युरियाच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही.

तसेच संतुलित खत वापराला चालना देण्यासाठी आणि जमिनीचा कस सुधारण्यासाठी एक धोरणात्मक उपाय म्हणून युरियाच्या गोणीचा आकार कमी करण्यात आला आहे.

युरियाचा अतिरिक्त वापर रोखणे आणि शेतकऱ्यांना खतांचा विवेकपूर्ण व कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे या उद्देशाने गोणीचा आकार 50 किलोवरून ४५ किलोपर्यंत आणि काही प्रकरणांमध्ये ४० किलोपर्यंत कमी करण्यात आला आहे.

सध्या, ४५ किलोच्या 'नीम कोटेड युरिया'च्या गोणीची कमाल किरकोळ किंमत (एम आर पी) प्रति गोणी २४२ रुपये आहे (नीम कोटिंगचे शुल्क आणि लागू कर वगळता) इतकी आहे.

त्याचप्रमाणे, 'सल्फर कोटेड युरिया'ची एम आर पी ४० किलोच्या गोणीसाठी २५४ रुपये आहे (केंद्र आणि  राज्याचे उपकर/GST वगळता) इतकी आहे.

सरकारने यावर भर दिला आहे की, शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता शाश्वत कृषी पद्धती सुनिश्चित करणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे.

ही माहिती रसायन आणि खते मंत्रालयाच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

अधिक वाचा: महसूलमधील महाघोटाळा; राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यातच केला बदल

टॅग्स :खतेशेतकरीसरकारकेंद्र सरकारशेती