Join us

'किसान ड्रोन' साठी उत्पादकांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू

By मुक्ता सरदेशमुख | Updated: September 10, 2023 16:00 IST

सरकारच्या वेगवेगळ्या योजनांतर्गत 'किसान ड्रोन ' चा पुरवठा करण्यासाठी उत्पादकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . ७ सप्टेंबर 2023 पासून हे ...

सरकारच्या वेगवेगळ्या योजनांतर्गत 'किसान ड्रोन ' चा पुरवठा करण्यासाठी उत्पादकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . ७ सप्टेंबर 2023 पासून हे अर्ज मागविण्यात येत असून यासाठी अर्ज करण्याची तसेच संबंधित कागदपत्रे भरून देण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 असणार आहे.

यासाठी उत्पादकांना पाच लाख रुपयांच्या रकमेसाठी संचालक विस्तार आणि प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे यांच्या नावाने किमान एक वर्षाच्या वैधतेसह तसेच प्रतिज्ञापत्र व अर्ज सादर करावयाचा आहे.

काय आहेत नियम व अटी?• कृषी विभागाच्या विविध योजना अंतर्गत सामुदायिक खरेदी सुलभ करण्यासाठी केवळ कृषी ड्रोन उत्पादकांना पॅनल मध्ये समाविष्ट केले जाईल .• कृषी ड्रोन उत्पादकांकडून प्राप्त झालेले अर्ज हे परिशिष्ट सी यामध्ये सूचीबद्ध असणे आवश्यक आहे• किसान ड्रोन हे डीजीसीए मंजूर आणि योग्य श्रेणी अंतर्गत डिजिटल स्काय पोर्टलवर नोंदणीकृत असावेत .• ड्रोन पुरवठा दाराकडे ड्रोन निर्मितीसाठी योग्य सेटअप व पायाभूत सुविधा असणे आवश्यक .• भारतीय गुणवत्ता परिषद किंवा अधिकृत चाचणी संस्थांचे मंजुरी प्रमाणपत्र आवश्यक, इत्यादी नियम आहेत .

याबाबत शासनाने सूचना जारी केली असून संबंधित ड्रोन उत्पादकांना  त्यावर अर्ज करता येईल.

टॅग्स :शेतीसरकारी योजनाशेतकरीपैसा