Join us

जागतिक नारळ दिन, कल्पतरू बद्दल विशेष माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2023 16:14 IST

धार्मिक, आरोग्य, सांस्कृतिक, खाद्यपरंपरा, तसेच व्यवसायिकदृष्ट्या नारळाला प्रचंड महत्त्व आहे. नारळ पिकाबाबत जनजागृती करण्यासाठी एशियन अँड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीकडून (एपीसीसी २००९ पासून २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो.

प्रत्येक भाग येतो वापरात; म्हणूनच आहे नारळाला महत्त्व. नारळ हे असे एकमेव फळ आहे की, ज्याच्या प्रत्येक भागाचा वापर होतो. शिवाय धार्मिक, आरोग्य, सांस्कृतिक, खाद्यपरंपरा, तसेच व्यवसायिकदृष्ट्या नारळाला प्रचंड महत्त्व आहे. नारळ पिकाबाबत जनजागृती करण्यासाठी एशियन अँड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीकडून (एपीसीसी) २००९ पासून २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो.

नारळाचे अर्थकारण आणि महत्त्वाविषयीदेशातील नारळाचे उत्पादन (उत्पादन हजार टनमध्ये) स्त्रोत: केंद्रीय कृषी मंत्रालय१९९१-९२     १०,०८०२००४-०५     ८,८२९२००९-१०     १५,७३०२०१४-१५     १४,०६७२०१९-२०     १४,००६ २०२१-२२     १३,२८३

पूजेसह आरोग्यासाठीही महत्त्वाचे- प्रत्येक धार्मिक पूजाविधींमध्ये नारळाचा वापर केला जातो.- नारळपाणी हे इलेक्ट्रोलाइटचा उत्तम स्रोत त्यामुळे शरीरात पाणी संतुलित प्रमाणात राहते.- ओल्या नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक मूल्ये असतात.- नारळाच्या दुधाचा विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापर होतो, तसेच नारळ तेलाचाही दररोज वापर केला जातो.- नारळाच्या काथ्यांपासून दोरी, पायपुसणी, चटई आदी विविध वस्तू तयार केल्या जातात.

प्रमुख उत्पादक राज्येराज्य  (क्षेत्रफळ/उत्पादन)कर्नाटक  (६०४.१० / ४०८८.००)तामिळनाडू (४४६.४७ / २५०७.४७)केरळ (७६७.८० / ३३०७.७८)आंध्र प्रदेश (१०९.०८ / ११२५.९४)प. बंगाल (३२.३६ / २८०.०७)ओडिशा (५२.७४ / २७३.३३)गुजरात  (२५.६० / १४६.६४)महाराष्ट्र  (३०.३२ / १४५.४०)आसाम  (२१.०३ / १०७.९४)बिहार  (१२.१६ / ५४.०६)अन्य राज्ये  (५७.९६ / २४६.४८)एकूण  (२१५९.६२ / १३२८३.११)(क्षेत्रफळ हजार हेक्टर्समध्ये, उत्पादन हजार टनमध्ये)

काही रंजक माहिती- नारळाच्या झाडाची सरासरी उंची ९८ फूट असते.- ६०-८० फुटांच्या झाडांना बुटके समजले जाते.- जगातील सर्वांत उंच नारळाचे झाड १८६ फूट उंच होते.- जगात इंडोनेशिया, फिलिपिन्स, भारतात नारळाचे सर्वाधिक उत्पादन होते.- एका झाडापासून दरवर्षी सरासरी १८० नारळ मिळतात.- दरवर्षी जगात नारळ डोक्यावर पडून १५० लोकांचा मृत्यू होतो.

टॅग्स :शेतीशेतकरीफळेपीक