Join us

Soybean storing Tips: सोयाबीनचा साठा करताय तर 'या' टिप्स नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:53 IST

Soybean storing Tips : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या सोयाबीनवर सध्या मोठे संकट आले आहे. साठा करून ठेवलेले सोयाबीन आता वाढत्या उष्णतेने अधिक कोरडे होऊन वजनात घट होत आहे. त्यामुळे सोयाबीन साठवणुकीच्या टिप्स (Soybean storing Tips) वाचा सविस्तर.

शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या सोयाबीनवर सध्या मोठे संकट आले आहे. साठा करून ठेवलेले सोयाबीन आता वाढत्या उष्णतेने अधिक कोरडे होऊन वजनात घट होत आहे. त्यामुळे सोयाबीन साठवणुकीच्या टिप्स (Soybean storing Tips) वाचा सविस्तर.

विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे घर किंवा शेड पत्र्याचे आहे, या ठिकाणचे सोयाबीनचे वजन घटत आहे. परांडा तालुक्यात यंदा १० हजार ६७३ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन लागवड झाली होती. सोयाबीन उत्पादन ही बऱ्यापैकी होते, परंतु, सुरुवातीपासूनच चार हजारांपर्यंत भाव असल्याने शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत होते.

दरम्यान, तालुक्यात काही शेतकऱ्यांची घरे पत्र्याची आहेत. काही शेतकऱ्यांनी शेतात किंवा गोठ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये सोयाबीन कुलूपबंद केले आहे. परंतु, उष्णतेमुळे पत्रा गरम होऊन सोयाबीनचे वजन कमी होताना दिसत आहे.

उन्हाच्या चटक्याने घट

पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले सोयाबीन उन्हाच्या चटक्यामुळे कोरडे होत जाते. वातावरणातील कोरडेपणा सोयाबीनचे वजन अधिक घटते. जेवढे दिवस सोयाबीन पत्र्याखाली असेल तशी वजनात घट वाढ होत असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात.

घर सोयाबीनने भरले

यंदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत सोयाबीन काढणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर दर प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये राहिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरातच सोयाबीन ठेवले आहे.

क्विंटलमागे घट किती ?

मळणीनंतर सोयाबीन वजन अधिक असते. यामुळे त्याची खरेदी व्यापारी टाळतात. कोरड्या सोयाबीन खरेदीवर भर असतो. अति उष्णतेमुळे सोयाबीनमध्ये साधारण क्विंटलमागे दोन ते चार किलो घट येते.

सोयाबीन उत्पादनातील खर्च हा मिळणाऱ्या दरापेक्षा अधिक आहे. सध्याच्या दराने सोयाबीन विकला तरी नुकसान होते. सध्या व्यापारी कमी दराने खरेदी करीत आहेत. याकडे कोणीही लक्ष देत नाही. - सचिन मोरे, शेतकरी

हमीभाव केंद्रावर नोंदणीला अडचणी येत आहेत. सोयाबीन पत्र्याच्या शेडमध्ये पडून आहे. या सोयाबीनला उंदराचा त्रास आहे. यामुळे नुकसान झाले आहे.  - हनुमंत जाधव, शेतकरी

सोयाबीन साठवणुकीसाठी 'या' पद्धतींचा अवलंब करा

* सोयाबीन कोरड्या आणि किंचित थंड ठिकाणी साठवावी. कोरड्या जागेमुळे उत्पादनास बुरशीसारख्या रोगाचा त्रास होणार नाही.

* हलक्या थंडीमुळे सोयाबीनच्या दाण्यातील उष्णता वाढणार नाही. यामुळे धान्य खराब होण्यापासून बचाव होईल.

* तापमानावर लक्ष ठेवा. जर ते वाढले किंवा हवेतील आर्द्रता वाढली तर उत्पादन बाहेर काढा. नंतर उत्पादनास ड्रायर किंवा कूलरच्या मदतीने वाळवा.

* सोयाबीन साठवण्यापूर्वी किंवा नंतर त्यावर हल्ला करणाऱ्या कीटकांवर लक्ष ठेवा. यामुळे सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान होते. उत्पादनामध्ये कोणत्याही प्रकारची कीटक दिसल्यास ते अजिबात साठवू नका कारण कीटकांचा हलका हल्ला देखील संपूर्ण उत्पादनाची नासाडी करू शकतो. स्टोअरमध्ये ठेवलेले सर्व धान्य खराब होऊ शकते.

* जर तुम्ही ग्रेन ड्रायरने सोयाबीन साठवून (Soybean Storing) ठेवण्यापूर्वी वाळवत असाल तर खबरदारी घ्यावी लागेल. उत्पादन जास्त सुकवू नका कारण त्यामुळे दाणे फुटू शकतात. जास्त कोरडे केल्याने देखील धान्य आकुंचन पावते.

* जर तुम्हाला नैसर्गिक हवेने सोयाबीन सुकवायचे असेल तर सच्छिद्र असलेला मजला वापरा. जेणेकरून हवा सहज जाऊ शकेल. सोयाबीन सुकवण्याव्यतिरिक्त ही हवा सोयाबीनला ताजे आणि निरोगी ठेवते.

हे ही वाचा सविस्तर : Summer Crop: उन्हाळी हंगामातील 'ही' पिके करतील का मालामाल? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेती