Join us

Soybean Sowing यंदा सोयाबीन पेरावं का? बियाण्याला मोजावे लागतायत इतके रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:41 PM

गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामात कमी पडलेल्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. सोयाबीनला ४५०० रुपये क्विंटल दर असून तीस किलोच्या बियाण्याला ३२०० रुपये मोजावे लागत आहेत.

गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामात कमी पडलेल्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. सोयाबीनला ४५०० रुपये क्विंटल दर असून तीस किलोच्या बियाण्याला ३२०० रुपये मोजावे लागत आहेत.

वाढलेला उत्पादन खर्च, कमी मिळत असलेला दर, महागडे बियाणे यामुळे सोयाबीनची शेती करावी का नको अशा अवस्थेत शेतकरी असल्याने चित्र पाहायला मिळत आहे.

जिरायती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबीनची काढणी करून शेतकरी रब्बीच्या शाळू पिकाची पेरणी करत असतात. गेल्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला दर बरा मिळाला होता तर उत्पादन चांगले निघाले होते.

त्यामुळे गतवर्षीच्या सोयाबीन हंगामात कऱ्हाड तालुक्यात पेरणीचे क्षेत्र वाढले. दोन वर्षांच्या तुलनेत पावसाचा खंड पडल्याने उत्पादन घटले तर पूर्ण वर्षभर दर वाढले नाहीत. ४२०० ते ४५०० च्या दरम्यान क्विंटलचा दर राहिला. त्यामुळे सोयाबीनची शेती तोट्यात गेली.

शासनाने पावसाचा खंड पडलेल्या मंडलात कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली व एक रुपयाचा विमा उतरविला अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार अशी आशा होती. त्याचे काय झाले समजले नाही.

शेतीची मेहनत, खत, बियाणे मजूर आदींचे दर वाढले आहेत. तीस किलो सोयाबीन बियाण्याचा दर ३२०० रुपये आहे म्हणजे किलोचा दर १२० रुपये तर विक्रीचा दर ४५ रुपये एवढी मोठी तफावत दिसून येत आहे.

दर वाढतील या आशेवर असून २० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही. सोयाबीनची शेती करावी की या पिकाला दुसरा पर्याय निवडावा अशा मनःस्थितीत शेतकरी दिसत आहेत.

पावसाचीही हमीसोयाबीन पिकाला जादा पाऊस आणि कमी पाऊस चालत नाही. साधारण पाऊस चालतो. काढता वेळी पाऊस आला तर मोठे नुकसान होते. दराची हमी नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. गेल्या वर्षीच्या शिल्लक सोयाबीनचा परिणाम नवीन येणाऱ्या सोयाबीनच्या दरावर होत आहे.

सोयाबीन पिकाला शासनाने हमी भाव दिला तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होतील. - शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना

अधिक वाचा: Turmeric Cultivation हळद लागवड करताय; बेण्याची निवड कशी कराल?

टॅग्स :सोयाबीनशेतीशेतकरीपेरणीपीकखरीपपाऊस