Join us

Shet Rasta : शेतरस्त्यांच्या समस्या आता तरी मार्गी लागणार का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 16:07 IST

Shet Rasta : गावपातळीवरील शेतरस्त्यांच्या (Shet Rasta) मुद्द्यावर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. याविषयी कार्यवाही करण्याचा आदेश बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्याची माहिती आहे.

Shet Rasta : गावपातळीवरील शेतरस्त्यांच्या (Shet Rasta) मुद्द्यावर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. याविषयी कार्यवाही करण्याचा आदेश बुलढाणा(Buldhana) जिल्हाधिकाऱ्यांनी(Collector) तहसीलदारांना दिल्याची माहिती आहे.

त्यामुळे मलकापूर येथील ८० टक्क्यांहून अधिक शेतरस्त्यांचा अनुशेष दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मलकापूर तालुक्यात सुमारे १ हजार ३०० किमीच्या शेतरस्त्यांची गरज आहे. त्याअभावी शेकडो शेतकऱ्यांना शेतीहितासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दळणवळणासाठीही वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या दशकात केवळ १०० किमी शेतरस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. तर ८० टक्क्यांहून अधिक शेतरस्त्यांचा अनुशेष कायमच आहे.

तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये शेतशिवारात शेतरस्त्यांचा अनुशेष कायम आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची शेतरस्त्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत.

या विषयावर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तोडगा अपेक्षित होता, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. गावपातळीवरील शेतरस्त्यांच्या मुद्द्यावर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

शेतशिवारातील शेतरस्त्यांची कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्याची माहिती आहे. ही बाब शेकडो शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर तहसीलदारांच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

शेतरस्त्यांचा प्रश्न जनता दरबारात!

मलकापूर येथील भ्रातृमंडळात काही दिवसांपूर्वी आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला. त्यात शेतकऱ्यांनी शेतरस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर योग्य त्या कारवाईसाठी आश्वस्त करण्यात आले होते, हे विशेष!हे ही वाचा सविस्तर : Agro Advisory : ढगाळ हवामानात कशी घेणार पिकांची काळजी? विद्यापीठाने दिला सल्ला

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीरस्ते वाहतूक