मारोती चिलपिपरे
कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतीव्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे पीक उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.
गुढीपाडवा होऊन महिना होत आला तरी शेतकामासाठी सालगडी(Salgadi) मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मात्र, दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सालगड्यांकडूनही(Salgadi) अधिकाधिक मागणी केली जात आहे.
यात सर्वाधिक दुचाकी आणि मोबाइलला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सालगडी(Salgadi) नेमताना शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोणत्याही शेतमालाला बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसल्याने शेती इतरांना ठेक्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कंधार तालुक्यातील परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे १० ते १५ एकरांपेक्षा अधिक जमीन आहे. जमिनीचे क्षेत्र मोठे असल्याने कुटुंबातील सदस्यांकडून सर्व कामे होत नाहीत. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना सालगडी(Salgadi) ठेवणे गरजेचे असते.
सध्या सालगड्याला सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण भागात शेतीचे नवे वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होते. दरवर्षी गुढीपाडव्यापासून शेती सांभाळण्यासाठी सधन शेतकरी सालगड्याची नेमणूक करतात.
सालगड्यांचे पूर्वीचे आर्थिक व्यवहार पूर्ण करून नवीन वर्षासाठी पुन्हा नेमणूक करण्यात येते. पण महिना होत आला तरी शेत कामासाठी सालगडी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सालगड्यांकडूनही (Salgadi) अधिकाधिक मागणी केली जात आहे.
पूर्वी वेळेवर पाऊस पडायचा, उन्हाळ्यातील विहिरी, नद्या-नाले यांना पाणी राहायचे. शेतकरी उन्हाळी पिके घ्यायची; परंतु अमर्याद वृक्षतोड आणि वाढते प्रदूषण, तापमान यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत गेला.
आता शेणखत मिळेना, उत्पादन वाढले क्षमतेत घट झाली. पूर्वी शेतकऱ्यांकडे भरपूर गोधन असायचे. त्यापासून शेणखत, शेतात राबण्यासाठी बैल, घरी दुग्धजन्य पदार्थांची कमी नसायची. मात्र, अलीकडच्या काळात चारा-पाण्याची टंचाई, राखणाऱ्या गड्याची मजुरी परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गोधन विकले आहे.
आता शेतकऱ्यांनाही पॅकेटचे दूध विकत घेऊनच चहा करावा लागतो. शेतीसाठी आवश्यक असलेल्या बैलजोडीच्या किमतीही लाखावर पोहोचल्या आहेत.
शेतमजुरांचीही कमतरता असल्याने मजुरीहीतही वाढ झाली आहे. बियाणे, खते, कीटकनाशक, तणनाशक यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
या सर्वांचा विचार करून वर्षभर राब राब राबून शेवटी पदरी निराशाच येत आहे. शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. कर्ज काढून शेतीसाठी खर्च केला तर निसर्गाच्या अवकृपेमुळे खर्चही निघणे अवघड झाले आहे.
ठेक्याने देतात शेती
* ठेक्याने शेती देणे ही विशेषतः महाराष्ट्रात, प्रचलित असलेली शेती करण्याची एक पद्धत आहे. यामध्ये, जमिनीचा मालक जमिनीचा वापर करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला ठराविक रकमेसाठी देतो.
* ठेकेदार ठरलेल्या कालावधीसाठी जमिनीवर शेती करतो आणि त्या बदल्यात ठेक्याची ठरलेली रक्कम जमिनीच्या मालकाला देतो.