Join us

शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:41 IST

राज्य शासनाने ४ मे रोजी काढलेल्या शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दुय्यम निबंधक कार्यालयाला दिला आहे.

सातारा : राज्य शासनाने ४ मे रोजी काढलेल्या शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दुय्यम निबंधक कार्यालयाला दिला आहे.

कोणत्याही शासकीय कामात जेवढे सुरळीपणा असेल तेवढे ते काम लवकर होते. त्यामुळे नागरिकांमधूनही या योजनांना प्रतिसाद मिळत असतो. त्याचबरोबर जेवढे कागदपत्रे वाढतील तेवढाच किचकटपणा वाढतो.

आताही तसेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काम होण्यास विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्यामुळे प्रशासनाने वेळीच योग्य तो निर्णय घेऊन नकाशाची आवश्यकता नसल्यास ते आवश्यक असल्याची अट रद्द करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

नियमांची अंमलबजावणी- महसूल व वनविभागाच्या वतीने नोंदणी संदर्भात लागू केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी सर्व दुय्यम निबंधकांना करणे आवश्यक आहे.- शासनाने प्रतिबंधित केलेल्या तुकड्याची म्हणजेच १० आर, २० आर क्षेत्राच्या खरेदीखतासाठी मोजणी नकाशा सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीचा गरजेचा आहे.- पण, त्यापेक्षा अधिक शेतजमिनीची खरेदी करण्यासाठी मोजणी नकाशाची गरज नसल्याचे सांगण्यात आले.

जमिनी रजिस्ट्रीवर परिणाम शक्य- शासनाने नोंदणी अधिनियमात केलेल्या बदलामुळे शेतजमिनीसह बक्षीसपत्र, साठेखत आदी कामे रखडली.- परिणामी, खरेदीखताचा टक्का घटला असून, शासनाला मिळणारा महसूलही घटला.- शासनाने प्रतिबंधित केलेल्या जमिनीच्या खरेदीखताला नकाशा लागतो.- २० आरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले क्षेत्र सहजासहजी नोंदणी करण्यात येते.

धावपळ वाढली- गहाणखत, हक्कसोड, एनए लेआऊट असलेल्या प्लॉटचे खरेदीखत होऊ लागले.- अचानकपणे मोजणीचा नकाशा आवश्यक केल्याने शेतकरी, खरेदीदार यांची धावपळ वाढली.- भूमिअभिलेख कार्यालयात शेतकरी गर्दी करू लागले. पण, मोजणीसाठी प्रतीक्षा असल्याने पंचाईत होत आहे.- लग्नविधी, शैक्षणिक शुल्क, शेतातील कामे, मशागत आणि खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले.- शासनाने आणखीन काही दिवसांची सवलत द्यावी, अशी मागणी होत आहेत.

शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणीराज्याच्या नोंदणी अधिनियमात करण्यात आलेल्या दुरुस्तीप्रमाणे आम्ही कामकाज करत आहोत. जे शासनाचे परिपत्रक किंवा नियमावली लागू केली, त्याची अंमलबजावणी करण्यात येत असून, नियमित कामे चालू आहे असल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

अधिक वाचा: मान्सून लवकर येण्याचे संकेत, पुढील आठवडाभर राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

टॅग्स :शेतीशेतकरीराज्य सरकारमहसूल विभागसरकारखरीप