Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी व मुद्रांक विभाग भरती; गट-ड संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 09:56 IST

nondni mudrank vibhag bharati 2026 नोंदणी व मुद्रांक विभागातील गट-ड संवर्गातील अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी प्रसिध्द झाली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर २७ फेबुवारी २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात अंतिम निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन करुन नियुक्ती देण्याचे निश्चित केले आहे.

उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे बहुउद्देशिय सभागृह, पाचवा मजला, पुणे येथे सोमवार, २ मार्च २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता हजर रहावे.

याबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वरील नमूद संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, असे पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

अधिक वाचा: कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या भोगवटादार वर्ग-२ जमिनी आता मालकीच्या होणार; कसा होणार फायदा?

English
हिंदी सारांश
Web Title : Registration & Stamps Dept Declares Final List of 284 Group-D Candidates

Web Summary : The Registration and Stamps Department announced the final selection list for 284 Group-D posts. Selected candidates should report to Pune Collector Office on March 2, 2026, for counseling and appointment. Details are available on igrmaharashtra.gov.in.
टॅग्स :महसूल विभागनोकरीऑनलाइनराज्य सरकारसरकारजिल्हाधिकारी