शिधापत्रिका धारकांसाठी एप्रिल महिन्याचे धान्य येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे ९० टक्के धान्य पुरवठा प्राप्त झाला आहे.
उर्वरित धान्य पुढील दोन दिवसांत येणार असून १० एप्रिलपासून सोमवार वगळता नियमित धान्य वाटप सुरू होणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
मार्च महिन्याचे धान्य वाटप अपूर्ण राहिल्याने लाभार्थ्यांना ७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. १० एप्रिलपासून लाखो रेशनकार्डधारकांना सोमवार वगळता नियमित धान्य पुरवठा सुरू होणार आहे.
शहरातील लाभार्थ्यांना गहू-तांदळाचे वितरण होणार आहे. तर ग्रामीण भागात रेशनवर धान्यासोबतच रॉकेलचे वितरण होणार असून शहरातील लाभार्थ्यांना मात्र रॉकेलपासून वंचित राहावे लागणार आहे.
गहू-तांदळाचेच वाटप◼️ एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांना गहू व तांदूळच दिला जाणार आहे.◼️ यापूर्वी तीन महिने ज्वारी वाटप करण्यात आले होते.◼️ मात्र, सध्या ज्वारीचे वाटप बंद करण्यात आले असल्याने लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.
..तर मार्चचे धान्य मिळणार नाहीमार्चचे वाटप अपूर्ण राहिल्याने दिलेली मुदतवाढ ७ एप्रिलला संपली आहे. त्यामुळे मार्चमधील न घेतलेल्या लाभार्थ्यांनी रेशन दुकानातून आता धान्य मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा: थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; आता एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरु, कुणाला होणार फायदा?
Web Summary : Ninety percent of April's ration has arrived for cardholders, excluding Mondays. Wheat and rice will be distributed in urban areas, while rural areas get grains and kerosene. Missed March's deadline? No ration now.
Web Summary : कार्डधारकों के लिए अप्रैल का नब्बे प्रतिशत राशन आ गया है, सोमवार को छोड़कर। शहरी क्षेत्रों में गेहूं और चावल वितरित किए जाएंगे, जबकि ग्रामीण क्षेत्रों को अनाज और केरोसिन मिलेगा। मार्च की समय सीमा चूक गए? अब राशन नहीं।