शिधावाटप विभागाकडून वारंवार आवाहन करूनही बहुतांश शिधापत्रिकाधारकांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्या कार्डधारकांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदतही संपुष्टात येत आहे.
मुदत उलटूनही केवायसी न केलेल्या कार्डधारकांनी ऑनलाइन केवायसी करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा बोगस रेशनकार्डच्या यादीत समाविष्ट होण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
केवायसी न केलेले लाभार्थी ठरणार बोगसज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी अजूनही झालेले नाहीत त्यांना 'मेरा ईकेवासी अॅप' आणि फोनद्वारे संपर्क करून ई-केवायसी करण्यासाठी सांगण्यात येते, पण याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आणि केवायसी पूर्ण न केल्यास लाभार्थी बोगस ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुदत उलटली; आता शासनच घेणार निर्णयशिधापत्रिकाधारकांना त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याची शासनाने ठरवून दिलेली मुदत पूर्ण झाली आहे, पण तरीही ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे, त्यांचे ईपॉज मशीन आणि 'मेरा केवायसी अॅप'द्वारे इ केवायसी होते. त्याचा लाभ कार्डधारकांनी वेळीच घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रेशनच्या धान्याची विक्री केल्यास शिधापत्रिका रद्दरेशनिंग विभागाकडून वितरित करण्यात येत असलेले मोफत व सवलतीचे अन्नधान्य संबंधित शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबीयांसाठी वापरणे आवश्यक आहे. मात्र, ते धान्य अन्यत्र विक्री केल्याचे आढळून येताच संबंधितांवर कारवाई करून शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
सरकारने निश्चित केल्याप्रमाणे शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीची मुदत संपलेली आहे, पण ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे, त्यांचे ईपॉज मशीन आणि 'मेरा केवायसी अॅप' याद्वारे ई केवायसी पूर्ण करता येत आहे. संबंधित शिधापत्रिकाधारकांनी त्याचा लाभ वेळीच घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक वाचा: आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी; कशी? वाचा सविस्तर