Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘या’ प्रकारातील लाभार्थ्यांचे रेशनकार्ड होणार आता रद्द; पुरवठा विभागाची नवी मोहीम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 09:59 IST

ration card update पुरवठा विभागाने शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थ्यांना वगळसाठीचे काम मिशन सुधार अभियान हाती घेण्यात आले आहे.

पुरवठा विभागाने शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थ्यांना वगळसाठीचे काम मिशन सुधार अभियान हाती घेण्यात आले आहे.

आधार क्रमांक आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पुरवठा निरीक्षक घरोघरी तपासणी करीत तालुकानिहाय संशयास्पद असून, लाभार्थी यादी तयार केली आहे.

ही नावे वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांकडे आहेत. शासनाकडून रास्त दुकानदारांमार्फत शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य पुरवठा करणारी योजना राबविली जात आहे.

या योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने योजनेत पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून अनेक लाभार्थ्यांची नावे वगळली होती. आता मिशन सुधार अभियानाद्वारे पुन्हा एकदा संशयास्पद लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

तहसील स्तरावर पुरवठा निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मिशन सुधार अभियानअंतर्गत शिधापत्रिकांची तपासणी केली जात आहे. शहरी आणि ग्रामीण भागात ही तपासणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

मृत, दुबार, संशयास्पद नावावर मारणार फुली◼️ मिशन सुधार अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे.◼️ त्यानंतर संशयास्पद नावे वगळण्याचा अधिकार हा तहसीलदारांकडे राहणार आहे.◼️ एकूणच या अभियानातून मृत, दुबार व संशयास्पद लाभार्थ्यांच्या नावावर फुली मारली जाणार आहे.

शिधापत्रिकांचे शुद्धीकरण अभियान◼️ प्राधान्य गट आणि अंत्योदय शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी मिशन सुधार अभियान राबविले जात आहे.◼️ या माध्यमातून दुबार, मृतक आणि संशयास्पद लाभार्थ्यांची नावे रद्द केली जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांचा आकडा आणखी कमी होणार आहे.

धान्य उचल, वार्षिक उत्पन्नाचीही पडताळणी◼️ राज्यातील शिधापत्रिकाधारकांत प्राधान्य गट व अंत्योदय लाभार्थ्यांच्या कुटुंबांचा समावेश आहे.◼️ पुरवठा विभाग धान्य उचल आणि वार्षिक उत्पन्नाची पडताळणी करीत असून, यात संशयास्पद लाभार्थी आढळल्यास कार्यवाही केली जाणार आहे.

अधिक वाचा: शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी फुलवली दीड कोटी उत्पन्नाची संत्रा शेती

टॅग्स :राज्य सरकारसरकारतहसीलदारअन्नकेंद्र सरकार