अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे व यासाठी पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे.
या अवधीत ई-केवायसी (E-KYC) न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील ३,७४,३३५ रेशनकार्डधारकांना सरकारी स्वस्त धान्याचा पुरवठा सध्या होत आहे. यामध्ये बोगस कार्डधारकांना रेशन धान्य पुरवठा होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाद्वारा विभाग उपाय योजले जातात.
यामध्ये आता संबंधित रेशन दुकानदाराकडील पॉस मशीनद्वारे (pos machine) ई-केवायसी करावी लागत आहे. यासाठी दोन वर्षांपासून पुरवठा विभागाद्वारा लाभार्थ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे.
यासाठी २८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिलेली असताना अद्याप ३२.६५ टक्के लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. मध्यंतरी फक्त १५ दिवस पॉस मशीन बंद होत्या. त्यानंतर नियमितपणे प्रक्रिया सुरू आहे. मात्र रेशन लाभार्थ्यांद्वारा ही प्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ई-केवायसी बाकी तालुकानिहाय लाभार्थी
अचलपूर ७६,४५६, तहसील ४०,१५३, मोर्शी ३६,३६३, अंजनगाव ३५,७०२, भातकुली २८,७९७, चांदूररेल्वे १७,२२४, चांदूरबाजार ६१,३३०, चिखलदरा ३४,९३८, दर्यापूर ३१,६६४, धामणगाव रेल्वे २८,७३६, धारणी ५९,३९९, नांदगाव खंडेश्वर १८,३३३, तिवसा २८,१५२, वरुड ४२,६४२ व अमरावती एफडीओमध्ये १,३५६,४८३ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही.
३३ टक्के शिधापत्रिकाधारकांनी फिरविली पाठ
रेशन दुकानात ई-केवायसी करण्यासाठी फक्त अधार कार्ड व शिधापत्रिका याच दोन गोष्टी आवश्यक आहेत. तरीही लाभार्थ्यांद्वारा टाळाटाळ करण्यात येत आहे.
का केली जाते ई-केवायसी?
शिधापत्रिक आधार क्रमांकासह संलग्न केल्यानंतर संबंधित कार्डधारकांचा अधार क्रमांक अचूक आणि तोच आहे, याची पडताळणी (सत्यापन) या प्रक्रियेद्वारे केली जाते. ओळख व पत्ता यासाठीदेखील ई-केवायसीची प्रक्रिया महत्त्वाची आहे.
शिधापत्रिकेतील सर्व व्यक्तींचे सत्यापण शिधापत्रिकेत नमूद सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन सत्यापण करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ज्या व्यक्तीचे सत्यापण होणार नाही, त्याचे नाव शिधापत्रिकेमधून वगळले गेल्यास व परिणामी त्यांचे शिधाजिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राहील.
प्रधान्य गट लाभार्थी | १५,१२,१३० |
ई-केवायसी बाकी | ६,७५,३७७ |
अंत्योदय लाभार्थी | ४,७८,५४८ |
प्राधान्य गट कार्ड | ३,७४,३३५ |
अंत्योदय | १,२८,२०७ |