रेशनकार्डच्या कामांसाठी सतत सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांना हैराण होऊन जातात. त्यावर उपाय म्हणून अकोल्याच्या अन्नधान्य वितरण अधिकारी (एफडीओ) (FDO) कार्यालयाच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
अकोल्याच्या अन्नधान्य वितरण अधिकारी (एफडीओ) (FDO) कार्यालयाच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमातून, रेशनकार्डच्या कामांसाठी चौकशी करण्याकरिता आता कार्यालयात फेरे मारण्याची गरज राहणार नाही.
रेशनकार्डच्या कामांसाठी नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जावर कार्यालयाचा 'व्हाट्सॲप' क्रमांक नोंद करून, त्याव्दारे अर्जदारांना कामाची माहिती (रिप्लाय) तातडीने देण्यात येणार आहे.
नागरिकांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्यात येतात. त्यानंतर त्या अर्जावर कार्यालयाकडून काय कार्यवाही करण्यात आली, काम झाले की नाही, यासंदर्भात सद्यस्थितीत नागरिकांना संबंधित अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागते.
या पार्श्वभूमीवर रेशनकार्डच्या कामासाठी केलेल्या अर्जाची पावती अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या 'व्हाट्सॲप' क्रमांकावर पाठविल्यास संबंधित अर्जदारास 'व्हाट्सॲप'व्दारेच अर्जाची माहिती तातडीने मिळणार आहे.
अकोल्याच्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून येत्या सोमवार ५ मे पासून पुरवठा विभागाच्या अकोला शहर विभागासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनकार्डच्या कामासाठी केलेल्या अर्जानंतर संबंधित कार्यालयाकडून काय कार्यवाही झाली, काम झाले की नाही आदी प्रकारच्या माहितीची चौकशी करण्यासाठी आता नागरिकांना कार्यालयात फेरे मारण्याची गरज राहणार नसून, अर्जाचा 'रिप्लाय' व्हाट्सॲप वरच नागरिकांना मिळणार आहे.
'या' कामांच्या अर्जाची माहिती 'व्हाट्सॲप' मिळणार!
रेशनकार्डच्या विविध कामे जसे की, नवीन रेशनकार्ड, दुय्यम रेशनकार्ड, रेशनकार्डमधील नावे कमी करणे, नवीन नावे समाविष्ट करणे आदी रेशनकार्डच्या कामासाठी अर्ज केल्यानंतर, त्या अर्जाची पावती अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या 'व्हाट्सॲप' क्रमांकावर टाकल्यास, अर्जावर काय कार्यवाही करण्यात आली, अर्जातील त्रुटी, काम झाले की नाही, यासंदर्भातील संबंधित अर्जदारास 'व्हाट्सॲप'व्दारे एक ते दोन दिवसांत मिळणार आहे.
येत्या ५ मे पासूनपासून हा उपक्रम अकोला शहर विभागाम सुरू करण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांना रेशनकार्डच्या कामासाठी केलेल्या अर्जासंदर्भात चौकशी करण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. - रामेश्वर भोपळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, अकोला.