Join us

Ration Card : रेशनकार्ड रद्द होऊन धान्य मिळणं बंद झालंय? पुन्हा सुरु करण्यासाठी काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:14 IST

Ration Card Update सलग सात महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या व्यक्तींचे धान्य बंद करण्यात आले आहे. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत धान्य ना उचलल्याने सद्यस्थिती धान्य पुरवठा बंद केला आहे.

सलग सात महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या व्यक्तींचे धान्य बंद करण्यात आले आहे. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत धान्य ना उचलल्याने सद्यस्थिती धान्य पुरवठा बंद केला आहे, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

रेशनकार्डधारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. लाभार्थी असूनही धान्य उचलत नसल्याने अशा ग्राहकांचे धान्य बंद करून इतर लाभार्थीना मिळावे, असे आदेश राज्य सरकारने दिले होते.

त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने माहितीच्या आधारे सलग सात महिने धान्याची उचल न केलेल्या ग्राहकांच्या रेशन कार्डवरील धान्यपुरवठा बंद करण्यात आला आहे.

धान्याची उचल नाही◼️ केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सर्व अंत्योदय आणि प्राधान्य योजनेंतर्गत मोफत धान्य दिले जाते.◼️ अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड ३५ किलो तर प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य ५ किलो मोफत धान्य मिळते, असे असूनही लाभार्थी धान्य उचलत नसल्याचे तपासणी अंती लक्षात आल्यावर गेल्या सात महिन्यापासूनच धान्य बंद केले आहे.

धान्य बंद, कार्ड रद्द झाल्यास काय पर्याय?◼️ धान्य बंद झाले असेल किंवा रेशन कार्ड रद्द झाले असेल, तर रेशन कार्यालय/तालुका पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.◼️ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा किंवा कार्ड सक्रिय करण्यासाठी अर्ज करा.◼️ सहा महिने धान्य न घेतल्यामुळे किंवा ई-केवायसी न केल्याने कार्ड रद्द होऊ शकते.◼️ ऑनलाइन पोर्टलवर जाऊन स्थिती तपासा आणि अर्ज करा किंवा कार्यालयात जाऊन चौकशी करा.

कशी करायची ई-केवायसी?ई-केवायसी करण्यासाठी, संबंधित सेवा प्रदात्याच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जा, आधार क्रमांक आणि आवश्यक तपशील भरा आणि त्यानंतर मोबाइलवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी करा. रेशन कार्डसाठी Mera KYC अ‍ॅप वापरा.

अधिक वाचा: आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी; कशी? वाचा सविस्तर

टॅग्स :सरकारराज्य सरकारऑनलाइनमोबाइलअन्न