Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रेबीज' १०० टक्के मृत्यूदर असणारा आजार; वेळीच ओळखून कसे कराल उपचार? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:46 IST

Rabies Dog Bite विशेषता भटकी कुत्री, मांजरी, कोल्हे, वटवाघुळे यांसारख्या प्राण्यांमधून हा विषाणू पसरतो. योग्य वेळी उपचार न केल्यास हा १०० टक्के मृत्यूदर असलेला आजार आहे.

रेबीज हा एक अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक व्हायरल आजार आहे जो प्रामुख्याने प्राण्यांच्या चाव्यामुळे माणसांना होतो.

विशेषता भटकी कुत्री, मांजरी, कोल्हे, वटवाघुळे यांसारख्या प्राण्यांमधून हा विषाणू पसरतो. योग्य वेळी उपचार न केल्यास हा १०० टक्के मृत्यूदर असलेला आजार आहे.

रेबीज टाळता येणे शक्य आहे. मोकाट प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, प्राण्यांच्या चाव्याला गांभीर्याने घेणे आणि वेळेत उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

समाजातील जनजागृती, पाळीव प्राण्यांचे लसीकरण आणि कुत्र्यांचे नियंत्रण ही या आजाराच्या निर्मूलनासाठी अत्यावश्यक पावले आहेत.

कशामुळे होतो?◼️ रेबीज विषाणू संक्रमित प्राण्यांच्या लाळेत असतो.◼️ जेव्हा असे प्राणी एखाद्या माणसाला चावतात, ओरखडा काळतात किंवा जखमेवर लाळ लागते तेव्हा तो विषाणू शरीरात प्रवेश करतो.◼️ विषाणू मज्जासंस्थेमार्गे मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तिथे गंभीर स्वरूपाची मोडतोड करतो.

लक्षणे कोणती?रेबीज झालेल्या प्राण्याने चावा घेतल्यानंतर काही आठवडे किंवा कधीकधी काही महिन्यांनी दिसू लागतात. याला वैद्यकीय परिभाषेत 'इन्क्युबेशन पिरियड' असे म्हणतात.◼️ प्रारंभिक लक्षणेताप, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, चाव्याची जागा जळजळणे किंवा तेथे मुंग्या येणे.◼️ गंभीर लक्षणेपाण्याची, प्रकाशाची भीती वाटणे, अतिशय चिडचिडेपणा येणे, मानसिक अस्थिरता, झटके येणे, श्वास घेण्यास त्रास होणे. शेवटी कोमा आणि मृत्यू.

उपचार काय घ्यावेत?रेबीजची लक्षणे दिसू लागल्यावर कोणताही प्रभावी औषधोपचार नाही. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.

कुत्र्याने चावल्यानंतर काय करावे?◼️ जखम तत्काळ स्वच्छ पाण्याने आणि साबणाने १५ मिनिटे धुणे.◼️ जखमेत अँटिसेप्टिक लावणे.◼️ त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन अँटी-रेबीज व्हॅक्सिन टोवून घेणे.

हेही लक्षात ठेवा!◼️ विशेषतः मोकाट, भटक्या कुत्र्यांमुळे भारतात रेबीजचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो.◼️ खबरदारी घेतली गेली तर हा आजार १०० टक्के टाळता येऊ शकतो.

लसीकरण◼️ कुत्री किंवा अन्य पाळीव प्राण्यांच नियमित लसीकरण करणे.◼️ प्राण्यांशी जवळचा संपर्क असणाऱ्या व्यक्तींनी (जसे की डॉक्टर, पशुवैद्यक, प्राणीसंवर्धक) प्रतिबंधात्मक लस घेणे◼️ कुत्रा किंवा चावल्यानंतर रेबीज इम्युनोग्लोबुलिन देणे बंधनकारक आहे.◼️ फक्त लसीकरण पुरेसे नाही कारण लसीला अँटीबॉडी प्रतिसाद विकसित होण्यासाठी दिवस काही लागतात.◼️ रेबीज इम्युनोग्लोबुलिन विषाणूंविरुद्ध थेट संरक्षण म्हणून काम करते आणि ते विषाणूला ताबडतोब निष्क्रिय करते.

अधिक वाचा: सिमेन सॉर्टिंग तंत्राने घडवला यशाचा गोठा; गलांडवाडीच्या संदीप शितोळेंच्या दुग्धव्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास

English
हिंदी सारांश
Web Title : Rabies: 100% fatal; Early detection and treatment are crucial.

Web Summary : Rabies, a deadly viral disease transmitted by animal bites, is preventable. Prompt wound care, vaccination, and animal control are crucial for elimination. Symptoms include fever, headache, and hydrophobia. Immediate treatment is essential after a bite.
टॅग्स :कुत्राआरोग्यऔषधंडॉक्टरऔषधं