Join us

कृषिवेद युवा शेतकरी व युवा कृषि संशोधक २०२५ पुरस्कारासाठी प्रस्ताव सुरु; 'येथे' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 20:28 IST

शेती माती संस्कृती आदींसाठी आपले योगदान आहे का? किंवा आपण आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर काही नावीन्यपूर्ण बदल शेतीत केले आहे का? तर आजच संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी (KVK Sagroli Nanded) यांच्या  "प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार" व "प्रयोगशील युवा कृषि उद्योजक पुरस्कार" २०२५ करिता आजच आपला प्रस्ताव तयार करा.

शेती माती संस्कृती आदींसाठी आपले योगदान आहे का? किंवा आपण आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर काही नावीन्यपूर्ण बदल शेतीत केले आहे का? तर आजच संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या  "प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार" व "प्रयोगशील युवा कृषि उद्योजक पुरस्कार" २०२५ करिता आजच आपला प्रस्ताव तयार करा.

संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे कृषिवेद युवा शेतकरी व युवा कृषि उद्योजक २०२५ करिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्कारास्ठी केवळ नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अर्ज करू शकतात. या पुरस्कारास्ठी अर्ज करण्याची मुदत २० डिसेंबर पर्यंत आहे.

पुरस्काराची श्रेणी : 'प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार' (पुरुष/महिला), 'प्रयोगशील युवा कृषि उद्योजक पुरस्कार' (पुरुष/महिला).

वयोमर्यादा : 'प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार' (पुरुष/महिला) २५ ते ३५ वर्ष, 'प्रयोगशील युवा कृषि उद्योजक पुरस्कार' (पुरुष/महिला) २५ ते ३५ वर्ष.

प्रस्ताव कोण पाठवू शकतो : फक्त नांदेड जिल्ह्यातील पुरुष व महिला शेतकरी, कृषि क्षेत्रातील व्यावसायिक, युवा कृषि उद्योजक, कृषि स्टार्टअप, कृषिविषयक सर्व व्यवसाय, शेतकरी उत्पादक कंपनी, फळ प्रक्रिया उद्योग, कृषि व कृषि उद्योग क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती.

प्रस्ताव पाठवतांना : पुरस्काराच्या प्रत्येक श्रेणीचा फॉर्म असून त्यासह आपला प्रस्ताव पोस्टाद्वारे, ईमेलद्वारे पाठवू शकतात. ज्यात संपूर्ण नाव, पत्ता व आपण राबविलेल्या शेतीतील अथवा कृषि उद्योग व संशोधन क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती, छायाचित्रे, वृत्तपत्रातील कात्रणे आदींसह आपले नामांकन प्रस्ताव पाठवावे.

प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत - दि. २० डिसेंबर २०२४ (टीप -अंतिम मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत कृपया याची नोंद घ्यावी.)

पुरस्कार वितरण - पुरस्कारार्थी निश्चित झाल्यावर कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे आयोजित कृषिवेद २०२५ या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते निवडक पुरस्कारार्थींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्कार वितरण ठिकाण - कृषिवेद २०२५ संस्कृतिसंवर्धन मंडळ द्वारे संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली , जिल्हा नांदेड-४३१७३१

प्रस्ताव पाठवण्याचा पत्ता : संस्कृतिसंवर्धन मंडळ द्वारे संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली , जिल्हा नांदेड पिन ४३१७३१

ईमेल - kvksagroli@gmail.com किंवा संपर्क – ८८३०७५०३९८, ८०८७६९७११७ 

महत्वाची सूचना : प्रस्ताव पाठवताना अर्धवट पाठवलेले प्रस्ताव ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. प्रस्तावासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवावीत त्याशिवाय प्रस्तावाचा विचार होणार नाही. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुरस्कार वितरणाच्या आधी भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल. अंतिम निवडीचे सर्व अधिकार निवड समितीला राहतील.

हेही वाचा : Organic Farming : गांडूळ खत निर्मितीतून शेतकऱ्याने फुलविली सेंद्रीय शेती; उत्पन्नाच्या देखील रुंदावल्या सीमा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनांदेडनांदेड