Join us

टंचाईग्रस्त १०७ गावांच्या शिवारात नवीन विहीर, बोअर घेण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:02 PM

प्रशासनाकडून दुष्काळी उपाय योजना जाहीर, गावातील पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटर अंतरावर दुसरा पाण्याचा स्रोत खंदण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळाचे संकट गहिरे झाले आहे. यामुळे प्रशासनाकडून दुष्काळी उपाय योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार, पाणीटंचाई असणाऱ्या १०७ गावात विहीर आणि बोअर घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या गावातील पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटर अंतरावर दुसरा पाण्याचा स्रोत खंदण्यास बंदी घालण्यात आली आहे. याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे, अशी गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे. पाणीटंचाई असणाऱ्या गावांमध्ये ज्या विहिंरीमध्ये पाणी उपलब्ध आहे. अशा विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये विहिरींद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे या विहिरींच्या बाजूस विहीर किंवा बोअर खंदल्यास गावाला पाणी पुरवठा सुरू असलेल्या स्रोतामध्ये पाणी शिल्लक राहणार नाही. यामुळे गावाची तहान भागवणाऱ्या विहिरीच्या बाजूला दुसरा पाणी स्रोत उभारण्यास तसेच सध्या असलेल्या विहिरीतून पाणी उपसा करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त १०७ गावांमध्ये ३० जूनपर्यंत पाणी उपसा करण्यास बंदी घातली आहे.

अंबड तालुक्यातील भांबेरी, दहयाळा, गंगाचिचोली, चुर्मापुरी, शिरनेर, झोडेगाव, पागीरवाडी, साष्ट पिंपळगाव, गोंदी, शहागड, वाळकेश्वर, करंजळा, वडीकाळ्या, पिठोरी सिरसगाव, भालगाव, कोठाळा खु..

बदनापूर तालुक्यातील आन्वी, सिंधी पिंपळगाव, राळा (आन्दी), शेलगाव, काजळा / पानखेडा, अकोला, ढासला, असोला, हिवराराळा, खादगाव, उजैनपुरी, गोकुळवाडी, खडकवाडी, पिरसावंगी, धामनगाव या गावांचा समावेश आहे.

पाणी उपसा करण्यास बंदी घातलेली गावे

  • भोकरदन तालुक्यातील बेलोरा, पळसखेडा,दाभाडी, मुठाड, तांदुळवाडी, दगडवाडी, जवखेडा बु., वडकी, बरंजळा साबळे, चिंचोली नि. 
  • घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली राठी, राणी उंचेगाव लिंबानाईकतांडा, राणी उंचेगाव अर्जुननगर, कंडारी अंबड, पिंपरखेडा बु., घाणेगाव, सरफगव्हाण, खालापुरी 

• जाफ्राबाद तालुक्यातील आळंद, बोरखेडी चिंच, बोरगाव मठ, बोरगाव बु., बोरी, जालना तालुक्यातील हिवरारोषणगाव, राममूर्ती. पिंपरी डुकरी, सोलगव्हाण, सेवली, घेटुळी, पानशेंद्रा, सामनगाव, वरखेड (सिंदखेड), वंजारउम्रद, बाजीउम्रद, एरंडवडगाव, शिवणी, डांबरी, पारेगाव, साळेगाव (ह),

• परतूर तालुक्यातील सुरुमगाव, वरफळवाडी, कान्हाळा, अकोली, ब्राह्मणवाडी, हरेरामनगर (दैठणा बु.), दैठणा बु., वाढोणा, आंबा, गोळेगाव आणि बाबुलतारा या गावांचा समावेश आहे.

• मंठा तालुक्यातील पिंपरखेड (ख), कर्नावळ, देवठाणा मंठा, किर्तापूर, माळतोंडी, किर्तापूर तांडा, अवलगाव, गेवराई, मंगरुळ, जांभरुण, हिवरखेडा, पांगरी गोसावी, लिबोना, तळेगाव, ठेंगेवडगाव, मुरुमखेडा, तळतोंडी, वरुड, वाघोडा, आंधवाडी, नायगाव, विडोळी बु., आर्डा तोलाजी, सासखेडा, दुधा, माळकिनी, दहिफळ खंदारे

टॅग्स :पाणी टंचाईपाणीजालना