Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरवळीच्या खतासाठी उपयोगी तागाचे बियाणे उत्पादनातून मिळावा अधिकचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:16 IST

ताग शेतीतून प्रतिएकर ९ ते १० क्विंटल उत्पादन (बी) मिळते. या बियांना सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल मिळतोय. अत्यंत कमी खर्चाचे व प्रति एकरी ६५ हजार रुपये हमखास उत्पादन देणारे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

रबी हंगामात अधिकाधिक उत्पादनासाठी वाडा तालुक्यातील शेतकरी विविध रब्बी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रयोग करीत आहेत. यावर्षी तालुक्यातील गोन्हे विभागातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी ताग पिकाची पेरणी केली आहे. सध्या ही तागाची शेती चांगलीच बहरली आहे.

वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी खर्च व अधिक उत्पादन देणारे ताग या पिकाची भर घातली आहे. गोन्हे विभागातील साई देवळी, मांडे, भोपिवली, खरिवली, वावेघर आदी दहा ते बारा गावांतील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी दीडशे एकर क्षेत्रावर ताग पिकाची पेरणी केली आहे. सध्या हे पीक फुलोऱ्यात आले असून, पिवळ्याधमक फुलांनी सोन्यावाणी शेती बहरली आहे.

अधिक वाचा: चिया पिकाची लागवड कशी करावी?

एकरी १० क्विंटल उत्पादनताग शेतीतून प्रतिएकर ९ ते १० क्विंटल उत्पादन (बी) मिळते. या बियांना सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल मिळतोय. अत्यंत कमी खर्चाचे व प्रति एकरी ६५ हजार रुपये हमखास उत्पादन देणारे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीकताग पिकाचे बियाणे १०० ते १२५ प्रतिकिलो दराने मिळते. वाल, मूग या पिकाप्रमाणे या बियाणाची पेरणी केली जाते. कुठल्याही प्रकारच्या खताची, पाण्याचीही आवश्यकता या पिकाला लागत नाही. साडेतीन महिन्यांत हे पीक पूर्ण तयार होऊन काढणीस तयार होते.

तागाच्या बीपासून तेलतागाच्या बीपासून तेल तयार केले जाते. या बीसाठी गुजरातमधून मोठी मागणी आहे. मागणी केल्यास कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तागाचे बियाणे पुरवले जाते, मात्र, या बियाणापासून तयार होणारी तागाची रोपे हिरवळीचे खत म्हणून वापरल्यास सेंद्रिय खत तयार होते.

रब्बी हंगामात चार एकरमध्ये पेरणी गतवर्षी केलेल्या ताग शेतीच्या प्रयोगात कमी खर्चात चांगले उत्पादन मिळाल्याने यावर्षीच्या रब्बी हंगामात चार एकरमध्ये तागाची पेरणी केली आहे. - जनार्दन पाटील, शेतकरी, साई देवळी, ता. वाडा

टॅग्स :पीकशेतकरीशेतीसेंद्रिय खतगुजरात