Join us

पीएम सूर्य योजेनचा लाभ घ्यायचायं, असा करा अर्ज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:47 AM

सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री - सूर्यघर मोफत वीज योजना सुरु करण्यात आली आहे. घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. या योजेनच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो ग्राहकांनी नोंदणी केली आहे. नेमकी या योजेनसाठी कशी नोंदणी करावी, हे समजून घेऊया. 

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला ३० हजार रुपये तर तीन किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. या योजेनच्या माध्यमातून घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

नोंदणी कशी आणि कुठे कराल?

वीज ग्राहकांनी रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करायची आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाइल अॅपही उपलब्ध आहे. 

या स्टेप फॉलो करून अर्ज करू शकता 

स्टेप 1

सर्वातआधी तुम्हाला अधिकृत पोर्टल https://pmsuryaghar.gov.in/ वर जाऊन वीज वितरण कंपनी निवडावी लागेल. त्यानंतर वीज वितरण क्रमांक निवडा आणि मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा. यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला रुफटॉप सोलरसाठी अर्ज करावा लागेल. मग अर्ज मंजुरीनंतर ही योजनेचा लाभ घेता येईल.

स्टेप 2 

घरावर इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा. अर्ज केल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल. आता तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट इन्स्टॉल करा. यानंतर तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल. तुम्हाला ही रिपोर्ट मिळाल्यावर, तुमच्या बँक खात्याची माहिती त्यात प्रविष्ट करा. यात तुमचे बँक खाते क्रमांक आणि कॅन्सल चेक पोर्टलवर सबमिट करा. त्यानंतर 30 दिवसांच्या आत सबसिडी तुमच्या बँक खात्यात प्राप्त होईल, अशी संपूर्ण प्रक्रिया आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीभारनियमनसूर्यग्रहणनाशिक