Join us

रब्बी पिकावरील कीड रोग कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 11:41 AM

या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडणार आहे त्यामुळे रब्बी पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सूचना कराव्यात.

ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव, महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अधिनिस्त असलेल्या क्षेत्र स्तरीय कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी “रब्बी पिकावरील कीड रोग एक दिवसीय कार्यशाळा” कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ प्रशांत शेटे, पिक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, राजगुरुनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी सतीश सिरसाठ, जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, खेडचे तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, शिरूरचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, आंबेगावचे तालुका कृषी अधिकारी श्रीम. सुजाता इंगळे, क्षेत्रीय मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्वेक्षक, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.

राजगुरुनगर उपविभागीय कृषी अधिकारी सतीश सिरसाठ म्हणाले की, रब्बी पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २०२३-२४ अंतर्गत रब्बी हंगामात आपल्या भागातील हरभरा, ज्वारी, मका, ऊस व इतर पिके महत्वाची आहे. या पिकावरील कीड व रोगांची ओळख, पिकाला नुकसान करण्याची अवस्था ओळखून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. तसेच क्षेत्रीय कृषी अधिकारी व तत्सम कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. 

कृषि विज्ञान केंद्राचे पिक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे म्हणाले की, या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडणार आहे त्यामुळे रब्बी पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सूचना कराव्यात. पुढे बोलताना म्हणाले पिकावरील कीड रोग सर्वेक्षण करते वेळी पिकावर येणारी कीड किंवा रोग याचे पहिल्यादा त्याचे वर्गीकरण हे नुकसान पातळीच्या वर किंवा नुकसान पातळीच्या खाली आहे का नाही हे पाहणे त्यानुसार उपयोजना करणे गरजेचे आहे त्यामध्ये कीड रोग नुकसान पातळीच्या खाली असल्यावर त्यासाठी जैविक घटकाचा वापर करावा त्यामध्ये निंबोळी अर्क, एरंडी तेल व इतर जैविक घटक वापर करावा. कीड व्यवस्थापांमध्ये निळे, पिवळे, कामगंध सापळे, फळमाशी सापळे इ. सापळ्याचा वापर करून कीड व्यवस्थापन करावे. यावेळी प्रकल्प अतंर्गत येणारे पिक हरभरा, ज्वारी, मका, ऊस व इतर पिकावरील कीड रोगाची ओळख, जीवनक्रम, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे मार्गदर्शन करताना म्हणाले की, पाण्याची उपलब्धता पाहून रब्बी पिकाची जिरायती तसेच बागायती वाणाची निवड करावी त्याचबरोबर रासायनिक खताची मात्रा जमिनीच्या ओलीनुसार देण्यात यावी. जैविक खताचा वापर जास्त करवा. त्याच बरोबर जैविक आच्छादन करावे. शिफारशीनुसार रब्बीतील हरभरा २५ सप्टेंबर नंतर जमिनीत ओल कमी होण्यापूर्वी करावी. रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी तसेच दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर ठेवावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी मानले.

टॅग्स :कृषी विज्ञान केंद्रकीड व रोग नियंत्रणनारायणगावपीकरब्बीमकाहरभराऊस