Join us

नाशिकच्या मुक्त विद्यापीठात पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 18:20 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह आजुबाजुंच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली असून पशूसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा राबविण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ...

नाशिक :नाशिक जिल्ह्यासह आजुबाजुंच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली असून पशूसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा राबविण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व इंडियन सोसायटी ऑफ व्हेटरीनरी सर्जरी यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 3 व 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पशु पालक असून पशूंची काळजी हा महत्वाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अखिल भारतीय पशुवैद्यकशास्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र शर्मा यांच्या हस्ते होणार असुन, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे असतील. कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, डॉ. अशोक करंजकर, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. बाबुराव नरवडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. 

मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेसाठी नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्यांतील पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध पशु-औषधे व पशुखाद्य कंपन्यांचे तज्ज्ञ तसेच भारतातील विविध पशुविज्ञान विद्यापीठांमधील 300 पेक्षा अधिक तांत्रिक अधिकारी उपस्थित राहतील. पशुसंवर्धन क्षेत्रातील संशोधन, त्यातुन पशुंचे आरोग्य व उत्पादनवाढीला मिळणारी चालना, या बदलांची प्रत्यक्ष पशुपालकांसाठी उपयुक्तता तसेच पशुधन व पशुपालकांच्या विविध अडचणी व त्यावरील उपाययोजना या विषयांवर सदर कार्यशाळेत उहापोह होणार आहे. 

शिबिराचेही आयोजन 

दरम्यान पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मोफत ब्रुसेल्ला चाचण्या करण्यासाठी शिबिराचेही आयोजन यादरम्यान करण्यात आले आहे. पशुसंवर्धन क्षेत्रातील उत्पादनवाढ, भविष्यातील पशुधन व्यवस्थापनातील संधी व वाव तसेच सक्षम व्यवसाय वाढीसाठी सदर कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके आणि पशुवैद्यकशास्त्र तज्ञ डॉ. शाम कडूस-पाटील यांनी दिली.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :नाशिकविद्यापीठशेती