Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन सातबारा उतारे, फेरफार सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद; पुन्हा किती तारखेला सुरु होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:41 IST

mahabhumi portal महाभूमी पोर्टल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा व ८-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची 'क' प्रत मिळवणे, फेरफार नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा या प्रमुख सेवा पूर्ण बंद राहतील.

संगणकीय प्रणालीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या सर्व ऑनलाइन सेवा गुरुवारपासून (दि. २) रविवारपर्यंत (दि. ५) तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.

या तांत्रिक समस्येमुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड आणि इतर ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी ही माहिती दिली.

या कालावधीत महाभूमी पोर्टल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा व ८-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची 'क' प्रत मिळवणे, फेरफार नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा या प्रमुख सेवा पूर्ण बंद राहतील.

कालावधीसुरू होण्याची वेळः गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ (रात्री ११:५९ वाजेपासून)समाप्तीची वेळः रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

प्रभावित होणाऱ्या सेवाभूमी अभिलेख व महाभूमी Portal वरील सर्व सेवा जसे ७/१२, Property Card, क प्रत, फेरफार (डिजिटल साईन व View Only) तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा व GRB Portal वरील सर्व सेवा बंद राहतील.

सूचनातांत्रिक कामामुळे सेवा खंडित होत असल्याने, नागरिकांनी आपली नियोजित कामे या कालावधीच्या आधी किंवा नंतर पूर्ण करावीत. सोमवारी, ६ एप्रिल २०२६ पासून सर्व सेवा पूर्ववत सुरू होतील. तरी होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

अधिक वाचा: 'शक्तिपीठ' महामार्गाच्या सुधारित आराखड्याला सरकारची मंजुरी; आता 'हे' नवीन तालुके जोडणार

English
हिंदी सारांश
Web Title : Online Satbara and Ferfar Services Temporarily Suspended; Resumption Date?

Web Summary : Online land record services, including Satbara extracts, will be temporarily unavailable from April 2nd to 5th, 2026, for maintenance. Services resume April 6th.
टॅग्स :सरकारराज्य सरकारऑनलाइनडिजिटल