ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यांसाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता व नियंत्रण मिळणार आहे.
वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या बँकिंग कायदे (दुरुस्ती) अधिनियम, २०२५ अंतर्गत या तरतुदी १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत. बँक ठेवी, लॉकर आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी नॉमिनी प्रक्रियेत बदल झाले आहेत.
वित्त मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, बँकिंग कायदे (दुरुस्ती) अधिनियम, २०२५ मधील कलम १०, ११, १२ आणि १३ या १ नोव्हेंबरपासून अमलात आले आहेत.
वित्त मंत्रालयाच्या २३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या सूचनेत म्हटले आहे की, हा कायदा १५ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचित करण्यात आला होता.
एकापेक्षा जास्त नॉमिनी◼️ ग्राहक आता त्यांच्या ठेवींसाठी एकावेळी किंवा अनुक्रमे जास्तीत जास्त चार नामनिर्देशित व्यक्ती करू शकतात.◼️ यामुळे अनपेक्षित प्रसंग घडल्यास दाव्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.◼️ ठेवीदारांना त्यांच्या पसंतीनुसार एकावेळी अनेक नॉमिनी किंवा अनुक्रमे नॉमिनी करण्याची मुभा असेल.◼️ सुरक्षित ठेवलेल्या वस्तू व लॉकरच्या नॉमिनीसाठी केवळ अनुक्रमे नॉमिनी करण्याची परवानगी असेल.◼️ ठेवीदाराला एकावेळी जास्तीत जास्त चार नामनिर्देशने करता येतील. प्रत्येकाला ठराविक टक्केवारी किंवा हिस्सा दिला जाईल. एकूण टक्केवारी १००% असणे आवश्यक आहे.◼️ ठेवीदार, लॉकरधारक किंवा सुरक्षित ठेवसुविधा घेणारे व्यक्ती जास्तीत जास्त चार नॉमिनी जाहीर करू शकतील.◼️ एखाद्या नॉमिनीचे निधन झाल्यावर पुढील नॉमिनीला हक्क लागू होईल. वारसा अधिकार स्पष्ट होईल आणि दावा करण्याची सातत्यपूर्ण सोय मिळेल.◼️ या नव्या तरतुदींमुळे ठेवीदारांना त्यांच्या गरजेनुसार नॉमिनी ठरवता येईल. तसेच दाव्यांची प्रक्रिया बँकिंग क्षेत्रात एकसमान, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल
उद्दिष्ट काय?◼️ बँकिंग क्षेत्रातील कारभार अधिक पारदर्शक करणे, आरबीआयकडे बँकांच्या अहवालात एकसमानता आणणे, ठेवीदार व गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे◼️ सार्वजनिक बँकांच्या लेखापरीक्षणाची गुणवत्ता सुधारणा करणे आणि ग्राहकांना नामनिर्देशन प्रक्रियेत अधिक सुविधा उपलब्ध करून देणे. सहकारी बँकांमधील संचालकांचा कार्यकाळही यातून नियमन केला जाणार.
कसे करावे नॉमिनी?◼️ या अंमलबजावणीसाठी सरकार लवकरच बँकिंग कंपन्या (नॉमिनी) नियम, २०२५ प्रकाशित करणार आहे.◼️ यात एकापेक्षा जास्त नामनिर्देशने कशी करावीत, बदलावी किंवा रद्द करावीत याची सविस्तर प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाईल.
अधिक वाचा: 'रेबीज' १०० टक्के मृत्यूदर असणारा आजार; वेळीच ओळखून कसे कराल उपचार? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Now, deposit holders can nominate up to four individuals for bank accounts, lockers, and safe deposits. This offers flexibility and simplifies claim processes, especially in unforeseen circumstances. The Banking Laws (Amendment) Act, 2025, effective November 1, 2025, aims for transparency and better depositor protection.
Web Summary : अब, जमाकर्ता बैंक खातों, लॉकरों और सुरक्षित जमा के लिए चार व्यक्तियों तक को नामांकित कर सकते हैं। यह लचीलापन प्रदान करता है और अप्रत्याशित परिस्थितियों में दावा प्रक्रियाओं को सरल करता है। बैंकिंग कानून (संशोधन) अधिनियम, 2025, 1 नवंबर, 2025 से प्रभावी, पारदर्शिता और बेहतर जमाकर्ता सुरक्षा का लक्ष्य रखता है।