Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता बोगस बियाणे, खताबाबत करा थेट तक्रार, कृषीमंत्री मुंडेंनी जाहीर केला हेल्पलाईन नंबर

By मुक्ता सरदेशमुख | Updated: July 20, 2023 23:28 IST

राज्यातील शेतकऱ्यांना आता बोगस बियाणे आणि खताच्या लिंकिंग प्रकरणी थेट तक्रार करता येणार आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ...

राज्यातील शेतकऱ्यांना आता बोगस बियाणे आणि खताच्या लिंकिंग प्रकरणी थेट तक्रार करता येणार आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधीमंडळात हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. बोगस बियाणे आणि खतांची विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक हाेत असल्यास ९८२२४४६६५५ या हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे.

राज्यातील बोगस बियाणे आणि खते यावर वातावरण तापलेले असतानाच विरोधकांनी सरकारला आज चांगलेच घेरल्याचे चित्र होते. बोगस बियाणे आणि खतांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध नवा कायदा आणण्याची घोषणा नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर बोगस बियाणे आणि खतांवर नियंत्रण आणण्यसाठी सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यावर विधीमंडळात बोलताना धनंजय मुंडे यांनी संपर्क क्रमांक जाहीर केला आहे व त्यावर तक्रार करण्याचे आवाहनही केले.

यावेळी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले. बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मुंडे यांनी शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरु करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :संसेदेचे पावसाळी अधिवेशनधनंजय मुंडेशेतकरी