Join us

घोलवडला नवीन ओळख; राज्यातील तिसरे 'मधाचे गाव'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2023 13:45 IST

पालघर जिल्ह्यातील घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने केली आहे. घोलवड ग्रामपंचायत आणि या मंडळाच्या पालघर कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घोलवड टोकेपाडा येथे मधाचे गाव जनजागृती मेळावा बुधवारी संपन्न झाला.

पालघर जिल्ह्यातील घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने केली आहे. घोलवड ग्रामपंचायत आणि या मंडळाच्या पालघर कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घोलवड टोकेपाडा येथे मधाचे गाव जनजागृती मेळावा बुधवारी संपन्न झाला. मूल्यांसाठी संघर्ष करा, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या 'मधाचे गाव' योजनेतून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी ग्रामस्थांना केले.

या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी मधसंकलन ते ब्रैंड विक्रीचे उद्दिष्ट सांगितले. तर बेटी बचाव, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी मधपालनातून राणीमाशी वाचविण्याचे वास्तव मांडले. या कार्यक्रम स्थळी तारपा नृत्याने मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना उपसरपंच कुणाल शहा यांनी करून मधाचे गाव संकल्पनेतून मथक्रांती यशस्वी करण्याचा विश्वास व्यक्त केला.

शेतीची उत्पादकता घटत असताना मधमाशी पालनातून ही तूट भरून काढण्यासाठी या गावाच्या प्रत्येक घरात किमान पाच मधपेट्या ठेवण्याचा मानस आहे. या मोहिमेत महिला बचतगटाने पुढाकार घ्यावा, ग्रामपंचायत निधीतून १५ टक्के रक्कम (तीन लाख रुपये) मधपेट्या ग्रामस्थांना वाटपासाठी गुंतवणूक करणार असल्याचे सरपंच रवींद्र बुजड यांनी सांगितले. हा पट्टा पर्यटनस्थळ असल्याने मधविक्रीने पंचक्रोशीत रोजगार संधी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाघाइतकीच मधमाशी वाचवण्याची आवश्यकता- पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमात या मधाच्या गावाचा उल्लेख व्हावा इतके झपाटलेले कार्य करण्याची ऊर्जा निर्माण करा, असा आशावाद मेघाश्रय फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमा सिंग यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.- या मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी मधाचे गाव मधुबन या विशेष उपक्रमातून मध उत्पादन, संकलन आणि विक्री या कार्याची माहिती दिली. सागरी पट्टयातील राज्यातील हे एकमेव मधाचे गाव असून त्याला पर्यटनवाढीचा लाभ होईल, असा आशावाद व्यक्त केला.- काळानुरूप वाघाइतकीच मधमाशी वाचवण्याची आवश्यकताही असल्याचे सांगितले. गावातील समुद्रकिनारा, अमृत सरोवर आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणांची माहिती मान्यवरानी घेतली.

टॅग्स :पालघरशेतकरीफळेशेती