बुधवारी सकाळी धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागात गूढ आवाज झाला. याची व्याप्ती पार लातूर हद्द ते नगर जिल्हा हद्दीपर्यंत होती. हा आवाज कशाचा? याचा सोक्षमोक्ष लागतो न लागतो तोच गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा गृह आवाजाने सलग तीनदा वर्दी दिली. यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत "आवाज कोणाचा?" नव्हे तर "हा आवाज कशाचा?" असाच गूढ प्रश्न चर्चित राहिला.
बुधवारी सकाळी साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान कळंब तालुक्यात देखील दोन वेळा मोठा आवाज जाणवला. याचा कंप खिडक्यांच्या काचऱ्यांना जाणवला. काही लोक असा आवाज तीनदा जाणवल्याचे सांगतात. त्यानंतर आवाजाची व्याप्ती संपूर्ण कळंब तालुकाभरात असल्याचे स्पष्ट झाले.
काही वेळात भूम, वाशी, धाराशिव इथवर तो आवाज जाणवल्याचा दुजोरा दिला जाऊ लागला, असे आवाज यापूर्वी अनेकदा अनुभवण्यास मिळालेल्या या भागात बुधवारच्या आवाजाची वारंवारता जास्त होती. यामुळे हा आवाज नेमका कशाचा? यावर जो तो एकमेकांना विचारताना दिसून येत होते. या दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या आवाजाच्या अनुषंगाने कोणत्याही भूकंपाची नोंद नसल्याचे अधिकृतरीत्या कळवण्यात आले होते.
प्रशासनाचा निर्वाळा; भूकंप नाही...
• कळंब परिसरात भूगर्भातून गूढ आवाज संदर्भातील माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) यांच्याकडे सदर माहिती पडताळणीसाठी पाठविली.
• त्यांच्या तपासणीनुसार या चारखरात मूळपाच कर णतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे. अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आवाहन केले आहे.
गुरुवारचा आवाज भयभीत करणारा...
गुरुवारी दुपारी झालेल्या आवाजाची तीव्रता बुधवारच्या आवाजापेक्षा जास्त होती. एका शाळेनं विद्यार्थी वर्गाबाहेर काढल्याचे समजते. एका शेतकऱ्याने पशुधन भेदरल्याचे सांगितले, लोकही आवाज झाल्यावर थास्तावले होते. एकमेकांकडे पाहत आवाजाची अनुभूती सांगत होते.
सलग दुसऱ्या दिवशीही धड्डाम
बुधवारचा आवाज नेमका कशाचा होता या प्रश्नाची उत्तरे निरुत्तरित असतानाच गुरुवारी दुपारी ३ ते ३ वाजून ११ मिनिटांच्या दख्यान तीनवेळा पुन्हा मोठे गूढ आवाज झाले. यातील दुसऱ्या आवाजाची तीव्रता जास्त होती. याची व्याप्तीपण इटकूर, पिंपळगाव, कळंब शहर, मोहा, वाशी तालुक्यातील पारा, आदी भागापर्यंत दिसून आली.
...अन् सुरू होतो खल
• एकदमच मोठा आवाज होतो. पण, तो कोठून होतो? हे आवाज अनुभवणाऱ्यांना कळत नाही. भूगर्भातून येतोय की आकाशात होतोय? याचा ताळमेळ लागत नाही. यामुळेच याला "गूढ" आवाज संबोधले जाते.
• हा भूगर्भीय हालचालीचा परिणाम आहे, हा एखाद्या व्लास्टिंगचा परिणाम आहे की एखादं सुपर सॉनिक विमान मार्गस्थ झालं? याचा मग खल सुरू होतो.
• दरम्यान, मागील दोन दिवसांपासून गूढ आवाजांची मालिका सुरू आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गूढ आवाजाचे 'गूढ' उलगडणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
Web Summary : Dharashiv residents are unnerved by mysterious sounds for two days. Despite no earthquake recorded, the source remains unknown, causing widespread concern and speculation among locals, with authorities investigating.
Web Summary : धाराशिव के निवासी दो दिनों से रहस्यमय आवाजों से परेशान हैं। भूकंप दर्ज नहीं होने के बावजूद, स्रोत अज्ञात है, जिससे स्थानीय लोगों में व्यापक चिंता और अटकलें हैं, अधिकारी जांच कर रहे हैं।