Join us

MCAER : कृषी परिषदेच्या महासंचालकपदी आयएएस वर्षा लढ्ढा यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:58 IST

राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी महाविद्यालयाचे नियंत्रण कृषी परिषद करते.

Pune : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नव्या महासंचालिका म्हणून वर्षा लढ्ढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुने महासंचालक रावसाहेब भागडे हे वयोमानानुसार निवृत्त झाले असून त्यांच्यानंतर आता या पदावर वर्षा लढ्ढा यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी काढले आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी महाविद्यालयाचे नियंत्रण कृषी परिषद करते.

दरम्यान, वर्षा लढ्ढा या महिला व बाल विकास विभागाच्या सचिव होत्या. त्या आष्टा येथील गणेश नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राम नारायण उंटवाल यांच्या कन्या आहेत. त्यांनी १९९८ मध्ये राज्य लोकसेवा आयागाची परीक्षा दिली होती. त्यावेळी त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली होती. पहिल्यांदा सिंधुदुर्ग येथे नियुक्ती झाली झाली आणि त्यानंतर साताऱ्यातील माण तालुक्यातील दुष्काळ निवारण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांनी शासकीय सेवेत असताना अनेक वेगवेगळ्या पदावर काम केले आहे. त्यामध्ये पुणे  कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात मागासवर्ग कक्षामध्ये तसेच बार्टी येथेही काम केले आहे. त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये राज्य सेवेतील २३ अधिकाऱ्यांची केंद्र शासनाने आयएएस केडरमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली होती.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी