Join us

Mango Tree ही महानगरपालिका एक लाख आंबा कोयींचे संकलन करून करणार हा आगळावेगळा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:38 IST

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्ष वसुंधरा अभियानामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबवित असते. शहरात हरित पट्टे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोयी संकलन मोहीम सुरू केली आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेने सुरू केलेल्या कोयी संकलन अभियानास शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. दोन दिवसांमध्ये २५ हजार कोयी संकलन झाले असून, १५ जूनपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. संकलित कोयींपासून रोपे तयार करून पालिका शहर ते गावापर्यंत आमराई फुलविण्याचा प्रयत्न करणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्ष वसुंधरा अभियानामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबवित असते. शहरात हरित पट्टे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोयी संकलन मोहीम सुरू केली आहे.

पर्यावरण दिनापासून सुरू झालेल्या या उपक्रमास शहरवासीयांनी उत्तम प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील हॉटेल्स, ज्यूस सेंटर व प्रत्येक घरातून आंब्याच्या कोयी संकलित कराव्या महानगरपालिकेच्या विशेष संकलन पथकाकडे सुपूर्द कराव्या, अशा सूचना दिल्या होत्या.

काय करणार कोयींचे?महानगरपालिका संकलित केलेल्या कोयीपासून रोपे तयार करणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात जागा उपलब्ध होईल तेवढी रोपे ठेवली जाणार आहेत. उर्वरित रोपे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या माध्यमातून नवी मुंबईतील विविध भागांसह ग्रामीण भागातील शेताच्या बांधांवर आमराई फुलविण्यात येणार आहे.

एक लाख कोयी संकलित होण्याचा पालिकेचा अंदाज● दोन्ही परिमंडळांसाठी कोयी संकलनासाठी वाहने उपलब्ध करून दिली होती. ९ पर्यावरण दिनाच्या दिवशी एकाच दिवशी १२ हजार व दुसऱ्या दिवशी १३ हजार अशा २५ हजार कोयी संकलित झाल्या आहेत.● नवी मुंबई महानगरपालिकेचा हा उपक्रम दि. १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.● नागरिकांनी आंबे खाल्ल्यानंतर कोयी कचऱ्यात न टाकता स्वच्छ धुवून सुकवाव्या व महानगरपालिकेच्या संकलन वाहनामध्ये द्याव्यात, असे आवाहन केले आहे.● संपूर्ण अभियानादरम्यान किमान १ लाख कोयी संकलित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा: Cloud Burst Rainfall ढगफुटी होते म्हणजे नक्की काय होते?

टॅग्स :आंबानगर पालिकानवी मुंबईशेतकरीमुंबई