Join us

आंबा निर्यातीत वाढ! उत्पादन वाढले उत्पादकांसाठी यंदा 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 9:10 PM

सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असून मोठ्या प्रमाणावर आंब्याचे आवक बाजारात होताना दिसत आहे.

पुणे : सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असून मोठ्या प्रमाणावर आंब्याचे आवक बाजारात होताना दिसत आहे. त्याचबरोबर पूरक वातावरणामुळे आंब्याची प्रत आणि उत्पादनही वाढले आहे. यामुळे निर्यातीलाही चालना मिळाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यात अधिक झाल्याची माहिती समोर आले आहे.

मागच्या वर्षी म्हणजेच सन २०२२-२३ मध्ये २२ हजार मीटर आंब्याची निर्यात केली होती त्यातून भारताला ३७६ कोटी रुपये मिळाले होते. पण हा आकडा यावर्षी वाढलेला असून २०२३-२४ या हंगामामध्ये जानेवारी २०२४ अखेरपर्यंत २७ हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाल्याची माहिती निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी दिली. यंदाच्या एकूण आंबा निर्यातीपैकी केशर आणि हापूस आंब्याची निर्यात ही ६ हजार टनांची आहे. 

जानेवारी २०२४ च्या अखेरपर्यंत झालेल्या निर्यातीतून भारताला ३९८ कोटी रुपयांनी मिळाले असून ही रक्कम मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. अजूनही आंब्याचा हंगाम संपलेला नसून मोठ्या प्रमाणावर निर्यात होणार आहे. यामुळे यंदाचे वर्ष हे आंबा उत्पादकांसाठी फायद्याचे ठरले आहे.

जीआय मानांकनामुळे शेतकऱ्यांना फायदा राज्यात मराठवाड्यातील केशर आणि कोकणातील हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळालेले असल्यामुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी फायदा होत आहे. त्याचबरोबर निर्यातीमध्ये जीआयचा फायदा होत असून अनेक शेतकरी मनंकनाचा क्यूआर कोड आंब्याच्या पेटीवर लावत आहेत. त्यामुळे ग्राहकांची विश्वासार्हता वाढून खरेदीतही वाढ होत आहे.

हवामानाची साथआंब्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे मोहोरगळती आणि फळमाशी ही सर्वांत मोठे आव्हाने आहेत. पण यंदा या दोन्ही संकटाचा परिणाम उत्पादनावर कमी प्रमाणात झाल्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान