Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? गोड मधापासून होतात तब्बल १८ फायदे; जाणून घ्या कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 21:43 IST

मधाचे मानवी शरिरासाठी अनेक फायदे आहेत.

मधमाशांच्या पोळ्यातून काढलेला मध म्हणजे जगातील सर्वांत गोड पदार्थ. या पदार्थावर कोणतीच प्रक्रिया न करताही तो सर्वांत जास्त गोड आहे. त्याचप्रकारे मधाचे आरोग्यदायी फायदेही भरपूर आहेत. अनेकदा आयुर्वेदिक उपायासाठी आणि लहान मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ करण्यासाठी मध खाऊ घालावा असं आपण ऐकलं असेल पण मध खाल्ल्याने होणारे तब्बल १८ फायदे आपल्याला माहिती आहेत का? 

मध हा सर्वगुणसंपन्न पदार्थ असून त्यावर  प्रक्रिया न करता नैसर्गिक पद्धतीना काढलेला मध खाल्ला तर अनेक फायदे शरिराला होतात. पण अनेकदा मधाच्या अतिसेवनाने आजार बळावू शकतात म्हणून मधाचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. बाजारातून मध विकत घेताना अनेकदा ग्राकांची फसवणूक केली जाते त्यामुळे खात्री करूनच मध विकत घेतला पाहिजे. 

मधाचे फायदे

  1. खोकला, कप, दमा या विकारांवर
  2. यकृताच्या पोटाच्या आजारावर मध सेवनाने फायदा होतो
  3. वजन कमी करण्यासाठी
  4. लहान मुले व वृध्दांना ताबडतोब हुशारी वाढविण्यासाठी
  5. थकवा दूर करण्यासाठी, जलद कार्यशक्ती मिळविण्यासाठी
  6. डोळ्यांच्या विविध विकारांवर अंजन म्हणून
  7. आयुमान वृध्दीसाठी, झिज भरून काढण्यासाठी
  8. हृदयाच्या स्नायूंना ताकद मिळते
  9. आम्लपित्त कमी करण्यासाठी
  10. हाडांच्या बळकटीसाठी
  11. भाजलेल्या व अन्य जखमा भरून येण्यासाठी
  12. अॅन्टीबॉयोटीक/अॅन्टीसेप्टीक
  13. लहान बाळाला मध अर्क म्हणून देता येतो
  14. मध पचनास हलका असतो
  15. १० ग्रॅम मधापासून सुमारे ३० ते ३५ कि. कॅलरीज मिळतात
  16. धार्मिक कार्यामध्ये (उदा. पंचामृत)
  17. निसर्गोपचार पध्दतीमध्ये
  18. केसांच्या सौदर्यासाठी व वृध्दीसाठी 
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी