Join us

ज्वारीच्या लाह्या बनविण्यासाठी भट्टयांचं काम करतंय आता मशीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:14 IST

Nagpanchami ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीपासून पोहे, रवा, मैदा, लाह्या, शेवया आदी पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

दीपक दुपारगडेसोलापूर : ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीपासून पोहे, रवा, मैदा, लाह्या, शेवया आदी पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. दोन दिवसांवर येऊन पोहोचलेल्या नागपंचमी या सणाला फार महत्त्व आहे.

दूध, ज्वारीच्या लाह्या व फुटाण्यांचा नैवेद्य दाखविला जातो. पार्श्वभूमी या पार्श्वभूमी बाजारात लाह्याबाबत पाहणी केली असता. पूर्वी बाजारात ज्वारी, राजगिरा, गहू, साळी आण मक्याच्या लाह्या अगदी सहजपणे उपलब्ध असत. कारण शहरात लाह्या तयार करण्यासाठी ५० ते ६० भट्टया होत्या. मात्र आता केवळ पाच भट्टया शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

पूर्वी नागपंचमीच्या पंधरा दिवस आधीपासून शहरात लाह्या बनविण्याची भट्टी सुरू होत असे. आता मात्र दोन महिने अगोदरच भट्टी सुरू करावी लागत आहे. अलीकडे रोस्टरद्वारे ज्वारीच्या लाह्या बनविल्या जातात, तर काहीजण घरीच तयार करीत आहेत.

त्यामुळे शहरात केवळ तीन विक्रेते शिल्लक असून, प्रत्येक विक्रेता किरकोळ आणि ठोक दराने विक्री करत आहेत. सध्या नागपंचमी सणाच्या तयारीने महिला वर्गात उत्साह दिसून येत आहे. महिलांना लागणाऱ्या वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. बाजारपेठेतील ज्वेलरीसह विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत.

लाह्या खाण्याचे काय आहेत फायदे?- धान्यांना जेव्हा भट्टीमध्ये भाजून उष्णता दिली जाते, तेव्हा लाह्या तयार होतात. उष्णता मिळाल्यामुळे लाह्या पचनास हलक्या होतात.- लाह्यांमध्ये लोह, तंतू, फॉस्फरस, क्षार, कॅल्शियम, व्हिटॅमिन-डी, थायमिन, राइबोफ्लेव्हिन योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यासाठीही लाह्या खाव्यात.- वाढत्या वजनाने त्रस्त असणाऱ्या मंडळींसाठी लाह्या हा एक सर्वोत्तम उपाय आहे.- पावसाळ्यात वातावरण बदलामुळे या काळात बऱ्याच जणांना सर्दी, खोकला, कफ असा त्रास होतोच.- कफ, सर्दी कमी करण्यासाठी लाह्या खाणे पोषक ठरते, लाह्या खाल्ल्यामुळे अॅसिडिटी कमी होते, लाह्यांमध्ये अॅण्टीऑक्सिडंट्स तसेच कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

किलोसाठी ज्वारीच्या लाह्यांचा दर १६० रुपये किलो आहे, तर होलसेलमध्ये एक किलोचा दर ८० रुपयांपर्यंत आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यासह गुलबर्गा, धाराशिव, सांगली, लातूर, अहमदनगर आदी ठिकाणाहून अधिक मागणी आहे. पूर्वी लाह्या तयार करण्यासाठी ५० ते ६० भट्टया होता, आता फक्त बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. - बंडू सिद्धे, लाह्याविक्रेते व्यापारी

टॅग्स :ज्वारीसोलापूरअन्नकाढणी पश्चात तंत्रज्ञानमहिलानागपंचमी