मुंबई : केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली.
१९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ९९३ रुपये इतकी मोठी वाढ करण्यात आली असून, छोट्या व्यावसायिक ५ किलो सिलिंडरच्या दरातही २६१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सामान्य ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे.
मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी ३ हजार २४ रुपये मोजावे लागतील. पूर्वी ही किंमत २ हजार ३१ रुपये होती, असे हॉटेल चालकांनी सांगितले. तर ५ किलोचे सिलिंडर आता ५४९ ऐवजी ८१० रुपयांना मिळेल.
निवडणुकीनंतर लगेच झालेल्या या दरवाढीमुळे लघुउद्योग, हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टॉल आणि कॅटरिंग व्यवसायांवर थेट परिणाम होणार आहे.
तेल कंपन्या दरमहा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, विनिमय दर आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन दर निश्चित करतात.
मार्चपासून चार वेळा दरवाढ◼️ १ मार्च २०२६ : ३० रुपये.◼️ ७ मार्च २०२६ : ११४ रुपये.◼️ एप्रिल २०२६ : २०० रुपये.◼️ १ मे २०२६ : ९९३ रुपये.
या वर्षी दर १,४०० रुपयांनी वाढले◼️ ऑगस्ट २०२५ : ३३.५० रुपये घट.◼️ नोव्हेंबर २०२५ : किरकोळ घट.◼️ जाने - मे २०२६ : सुमारे १,४०० रु. वाढ.
गेल्या १२ महिन्यांचा ट्रेंडमहिना - दर (रुपयांत)जून २०२५ - १,७२३जुलै २०२५ - १,६६५ऑगस्ट २०२५ - १,६३१सप्टेंबर २०२५ - १,५८०ऑक्टोबर २०२५ - १,५९५नोव्हेंबर २०२५ - १,५९०डिसेंबर २०२५ - १,५८०जानेवारी २०२६ - १,६९१फेब्रुवारी २०२६ - १,७४०मार्च २०२६ - १,८८३एप्रिल २०२६ - २,०७८मे २०२६ - ३,०७१
अधिक वाचा: एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज
Web Summary : Commercial LPG cylinder prices significantly increased, with a ₹993 hike for 19kg cylinders in Mumbai, now costing ₹3,024. Domestic cylinders remain unchanged, offering temporary relief. The rise impacts businesses like hotels and restaurants.
Web Summary : व्यावसायिक एलपीजी सिलेंडर की कीमतों में भारी वृद्धि हुई, मुंबई में 19 किलो के सिलेंडर के लिए ₹993 की वृद्धि हुई, अब इसकी कीमत ₹3,024 है। घरेलू सिलेंडर अपरिवर्तित रहे, जिससे अस्थायी राहत मिली। इस वृद्धि से होटल और रेस्तरां जैसे व्यवसायों पर असर पड़ेगा।