मिलेट्स म्हणजेच भरडधान्ये किंवा तृणधान्यांचे मानवी आहारामध्ये खूप महत्त्व आहे. भारतातील लोकांचे पारंपारिक अन्न हेच होते. पण हरितक्रांतीनंतर आपल्याकडे गहू आणि तांदळाचे आहारातील प्रमाण वाढत गेले आणि भरडधान्याचे प्रमाण कमी होत गेले. २०२३ हे वर्ष सर्वांनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर मिलेट्सचे महत्त्व पुन्हा जगाला कळाले. पण मिलेट्समध्ये असलेल्या ८ ते १० धान्यांची ओळख आपल्याला आहे का?
ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी 'सावा' या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात.
सावा (Little Millets)
* लघु तृणधान्य हे छोटे, गोल व लालसर करड्या रंगाचे असते. त्यांना कुटकी, काब्बु आणि पोन्नी असे म्हटले जाते.
* लघु तृणधान्य हे मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त व लोह याचा समावेश असलेल्या खनिज पदार्थांचा उत्तम स्त्रोत आहे. मॅग्रेशियम हृदयाचे आरोग्य वाढवते तर फॉस्फरस हे वजन कमी करण्याचे ऊतिची भरपाई करण्याचे व ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे.
* लघु तृणधान्य हे पाचक तंतुमय पदार्थ व जीवनसत्व बी-१, जीवनसत्व बी-२ व जीवनसत्व बी-६ यांच्यासारख्या जीवनसत्वांचा उत्तम स्त्रोत आहेत. त्यात मेद व कॅलरीज देखील कमी असतात
(माहिती संदर्भ - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे)