Mango Farming : सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र आगरी ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे तसेच कृषि व आत्मा विभाग, छत्रपती संभाजीनगर व कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
केव्हा, कुठे, कधी? आंबा - उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रमगुरुवार, दि. १७ जुलै २०२५, सकाळी ९:३० वाजताकृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, जि. - छत्रपती संभाजीनगर.
प्रशिक्षणातील विषय
- निर्यातक्षम आंबा लागवड व त्याचे काढणीपश्चात तंत्रज्ञान
- आंबा फळ पिकावरील कीड व रोग नियंत्रण
- आंबा पिक खत व पाणी व्यवस्थापन
- केशर आंबा निर्यात कृषी पद्धती
- लिंग समानता व सामाजिक समावेशन (GESI)
प्रशिक्षण कोणासाठी?प्रगतशील शेतकरी, विद्यार्थी, महिला बचत गट व शेतीची आवड असणारे सर्व.
अधिक माहितीसाठी
हेमंत जगताप, मनुष्यबळ विकास व वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी एम सी डी सी, पुणे ८२७५३७१०८२