Join us

Women Success Story : वैशालीताईंचा गृहउद्योग बनला महिलांसाठी रोजगाराचा हक्काचा आधार! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:40 IST

Women Success Story : खडतर परिस्थितीतूनही आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यशाचा आलेख चढणाऱ्या महिलांची उदाहरणं प्रेरणादायक असतात. अशाच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू येथील वैशाली हिवरगंड यांनी एक लहानसा गृहउद्योग सुरू करून केवळ स्वतः च्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधली नाही, तर इतर महिलांसाठीही रोजगाराची संधी निर्माण केली आहे. (Women Success Story) वाचा सविस्तर

Women Success Story : खडतर परिस्थितीतूनही आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यशाचा आलेख चढणाऱ्या महिलांची उदाहरणं प्रेरणादायक असतात. बचत गटातून घेतलेल्या कर्जाच्या सहाय्याने सुरू झालेला पापड-कुरडईचा व्यवसाय आज एक यशस्वी गृहउद्योग बनला आहे. (Women Success Story)

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू येथील वैशाली हिवरगंड यांनी एक लहानसा गृहउद्योग सुरू करून केवळ स्वतः च्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधली नाही, तर इतर महिलांसाठीही रोजगाराची संधी निर्माण केली आहे.  (Women Success Story)

बचत गटातून घेतलेल्या कर्जाच्या सहाय्याने सुरू झालेला पापड-कुरडईचा व्यवसाय आज एक यशस्वी गृहउद्योग बनला आहे. महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारल्यास प्रगतीची दारे कशी उघडतात, याचे उत्तम उदाहरण ठरल्या आहेत वैशाली पाराप्पा हिवरगंड.  (Women Success Story)

केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या वैशाली यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि महिलाबचत गटाच्या सहकार्याने एक छोटासा गृहोद्योग सुरू केला आणि आज त्या परिसरातील अनेक महिलांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. (Women Success Story)

असा सुरु झाला उद्योगाचा प्रवास

२०१८ साली श्रीदत्त महिला बचत गटाच्या माध्यमातून एक लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी पापड मशीन व पिठाची गिरणी घेतली.

सुरुवातीपासूनच त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. पहिल्याच वर्षात त्यांनी सव्वा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. बचत गटाचे कर्जही वेळेवर परत केले.

यशाच्या पायऱ्या चढत त्यांनी पुढे कुरडई तयार करणारी मशीन, पापड ड्रायर, मिक्सर मशीन अशी साधने खरेदी करत आपला गृहोद्योग विस्तारित केला. त्यांनी उडीद डाळ पापड, मूगडाळ पापड, पोहे पापड, तांदळाचे पापड, गव्हाच्या कुरड्या, शेवया, चकल्या असे विविध चविष्ट खाद्यपदार्थ उत्पादनात आणले.

आज वैशाली यांचा ‘श्रीदत्त महिला गृहोद्योग’ हे नाव स्थानिक महिलांसाठी नवे संजीवन ठरले आहे. त्यांच्याकडे आता चार ते पाच महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला असून, परिसरातील अनेक गावांतील महिला त्यांच्या सेवांचा लाभ घेत आहेत.

थडी उक्कडगाव, गंगापिंप्री, वाडीपिंपळगाव, मुदगल, डिघोळ, सायखेडा अशा गावांतील महिला त्यांच्याकडून दर्जेदार घरगुती उत्पादने घेऊन जात आहेत.

इतर महिलांनाही रोजगार

यासाठी त्यांनी चार ते पाच महिलांना कामावर ठेवून त्यांनाही या गृहोद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेळगावसह परिसरातील थडी उक्कडगाव, गंगापिंप्री, वाडीपिंपळगाव, वाणीसंगम, लासीना, मुदगल, वाघलगाव, दुधगाव, डिघोळ, कान्हेगाव, सायखेडा, लोहिग्राम येथील महिला पदार्थ तयार करून घेण्यासाठी येत आहेत. सेवा वेळेत मिळावी, यासाठी इतर महिलांनाही त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

वैशाली हिवरगंड यांनी सांगितले की, शिक्षण मर्यादित असले तरी इच्छाशक्ती अपार होती. मेहनतीवर विश्वास ठेवत गृहोद्योग सुरू केला आणि आज या उद्योगामुळे मी स्वतःसह इतर महिलांनाही रोजगार देऊ शकते. हीच माझी खरी कमाई आहे.

शिक्षण दहावीपर्यंत झाले असून, आपला एक छोटा उद्योग असावा, अशी इच्छा होती. त्यासाठी बचत गटातून कर्ज घेत महिला गृहोद्योगाला प्रारंभ केला. परिश्रम, वेळेत सेवा यामुळे उद्योगात यश मिळत गेले. आज मी माझ्या व्यवसायावर समाधानी आहे.  - वैशाली हिवरगंड, शेळगाव महा.

हे ही वाचा सविस्तर :  Mofat Pithachi Girani yojana: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; लाभार्थी होणार आत्मनिर्भर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिलासरकारी योजना