Sugarcane Juice : रणरणत्या उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी थंडगार पेये उपयुक्त असतात. यामध्ये विशेषकरून रस्त्याच्या कडेला रसवंती गृहे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र अनेकदा उसाचा रस पाहून लोक नाक मुरडतात. तर काही रसवंती गृहांची वाहवा केली जाते. कारण त्यांनी रसासाठी वापरलेला ऊस होय.
रसासाठी कुठला ऊस बेस्ट असतो, ते आपण पाहुयात. ज्यामुळे ऊस रसदार आणि घट्ट होत असतो. यामध्ये प्रामुख्याने को-८६०३२ (Co 86032 - नयना) आणि को-४१९ (Co 419) या उसाच्या जाती सर्वोत्तम मानल्या जातात. या जातींचा ऊस मऊ, रसाळ, गोड आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रसवंतीसाठी (Sugarcane Juice) अत्यंत लोकप्रिय आहे.
रसासाठी उत्तम ऊस जाती आणि वैशिष्ट्ये : को-८६०३२ (Co 86032) : ही जात सध्या रसासाठी सर्वाधिक वापरली जाते. हा ऊस लांब, मध्यम जाडीचा आणि भरघोस रसाचा असतो. को-४१९ (Co 419) : खास रसवंतीसाठी प्रसिद्ध असलेली ही जुनी पण गोडव्यासाठी लोकप्रिय जात आहे. रंग : हिरवट-पिवळा किंवा हलका निळसर रंगाचा ऊस रसासाठी चांगला मानला जातो, कारण त्यात धागे कमी असतात. उत्तम रसासाठी टीप : उन्हाळ्यात रसासाठी साधारणपणे ७ ते ८ महिन्यांचा ऊस वापरणे योग्य असते, ज्यामुळे रस अधिक गोड लागतो.
Web Summary : For refreshing sugarcane juice, Co 86032 and Co 419 varieties are best. These are juicy, sweet, and produce high-quality juice. Use 7-8 month old sugarcane for optimal sweetness.
Web Summary : ताज़ा गन्ने के रस के लिए, को 86032 और को 419 किस्में सबसे अच्छी हैं। ये रसदार, मीठे होते हैं, और उच्च गुणवत्ता वाला रस पैदा करते हैं। बेहतर मिठास के लिए 7-8 महीने पुराने गन्ने का प्रयोग करें।