Join us
Daily Top 2Weekly Top 5

Wheat production : गहू उत्पादनात यंदा 3.16 लाख मे. टन उत्पादन अपेक्षित, सध्या कुठला गहू तेजीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:35 IST

Wheat Production : यंदाच्या हंगामात सरासरी ७० हजार २९३ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली होती.

नाशिक : गतवर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने जिल्ह्यात गव्हाच्या क्षेत्राचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सरासरी ७० हजार २९३ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली होती.

गव्हाच्या सोंगणीला जिल्ह्यात सुरुवात झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत प्रति हेक्टरनुसार उत्पादनात वाढ होऊन ३ लाख १६ हजार ३१८ मेट्रिक टन उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यात यंदा गव्हाची पेरणी पाहता उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ होणार आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण अधिक असले तरी उन्हाची तीव्रता फेब्रुवारी आणि मार्च सुरू होताच वाढू लागल्याने पाण्याचे प्रमाण उन्हाळ्यात कमी पडणारे तालुके सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड, देवळा व मालेगाव आणि इतरही तालुक्यातील पेरणी केलेल्या गव्हाच्या हार्वेस्टरच्या सहाय्याने काढणीला सुरुवात झाली आहे.

गव्हाच्या पेरणीने सरासरी मोडून यंदा मागील वर्षीच्या तुलनेत नऊ हजार हेक्टरने वाढ झाली होती. मागील वर्षी २०२४-२५च्या हंगामात ६१ हजार २८ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती. २०२५-२६ या हंगामात नऊ हजार हेक्टरने वाढ होऊन ७० हजार ३९३ इतक्या हेक्टरवर पेरणी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात कांदा, गहू, हरभरा ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदा मात्र पाण्याचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने यंदा शेतकऱ्यांनी गहू पिकाला प्राधान्य दिले आहे.- राधिका बैरागी, तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कार्यालय, नाशिक.

सध्याचे गव्हाचे दर पाहुयात 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/03/2026
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1051780013001050
खेड-चाकण---क्विंटल175100014001200
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल175002511146700
कळवणलालक्विंटल32004001195801
पुणेलोकलक्विंटल153584001400900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7140016001500
कामठीलोकलक्विंटल28204025402290
कळवणउन्हाळीक्विंटल28009001375

1000

 

 

पीएम किसानचा हफ्ता येणार, पण पैसे खात्यावर येण्याची वेळ बदलली, किती वाजता येतील पैसे? 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Sees High Wheat Yields: Production Expected at 3.16 Lakh MT

Web Summary : Nashik district anticipates 3.16 lakh MT wheat production due to favorable rainfall. Wheat cultivation area increased by 9,000 hectares compared to last year. Farmers preferred wheat over costly onion crops, given ample water availability.
टॅग्स :शेती क्षेत्रगहूशेतीमार्केट यार्ड