Join us

नाशिक जिल्ह्यात विकसित कृषी संकल्प अभियानास प्रारंभ, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:33 IST

Agriculture News : कृषी विज्ञान केंद्र (Krushi Vidnyan kendra Nashik, Malegoan) नाशिक, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव, आत्मा व कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. 

नाशिक : खरीप हंगामापूर्वी (Kharif Season)  शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी जाऊन करण्यासाठी जिल्ह्यात 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत  विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र (Krushi Vidnyan kendra Nashik, Malegoan) नाशिक, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव, आत्मा व कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्यातर्फे संपूर्ण देशात विकसित कृषी संकल्प अभियान  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , नाशिकचे कृषी उपसंचालक  महेश वेठेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांतील 180 गावांमध्ये या अभियानादरम्यान विविध मार्गदर्शक शिबिरे, चर्चा सत्रे, पद्धत प्रात्यक्षिके, शासकीय योजनांची माहिती, नैसर्गिक शेती, ड्रोन प्रात्यक्षिके, नाविण्यपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञान प्रसार आदी कार्यक्रम होत आहेत. 

या कालावधीत अधिकाऱ्यांची दोन पथके कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्रांचे व इतर संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी गावात जावून शेतकऱ्यांना संवादपर मार्गदर्शन करणार आहेत. यात खरीप हंगामातील पिकांना तसेच पशुधनासाठी उपयुक्त असणारे तंत्रज्ञान, माती व पाणी परिक्षणानुसार खत व्यवस्थापन, मृद आरोग्य पत्रिका, कीड नियंत्रण, जैविक शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ड्रोनद्वारे फवारणी तसेच कृषी विभागाच्या विविध  योजना शेतकऱ्यांपर्यत पोहोचविल्या जात आहेत.

मालेगाव कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन या पार्श्वभूमीवर मालेगाव कृषी विज्ञान केंद्राकडून सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, चंद्रपूर ,गुही या ठिकाणी तर कळवण तालुक्यातील दळवट,कोसुर्डे,शेपुपाडा या गावांत विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत खरीप पिकातील लागवड तंत्रज्ञान, जमिन आरोग्य व्यवस्थापन, तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर या विषयांवर शास्त्रज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. 

या अभियानात कृषि विज्ञान केंद्र मालेगावतर्फे 2 विशेष समित्या असून यात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील शास्त्रज्ञ, महात्मा फुले कुषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरीय कृषि अधिकारी, संशोधक आणि प्रगतशील शेतकरी यात सहभागी आहेत. शिवाय व्हॉटसॲप WhatsApp गट आणि दैनिक अहवाल संप्रेषणाच्या माध्यमातून नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीशिवराज सिंह चौहान