Join us

Vegetable Farming : उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्यांची फायदेशीर शेती, 45 रुपयांत मिळतेय बियाणे, असे करा ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:33 IST

Vegetable Farming : राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या (National Seed Corporation) वेबसाईटवर बियाणे विक्री सुरु आहे.

Vegetable Farming :  अलीकडच्या काळात आहारात हिरव्या पालेभाज्या (Vegetable Farming) असणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे बाजारात नेहमीच हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात असतात. पालेभाज्या खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. म्हणून पालेभाज्यांची शेती फायदेशीर ठरते. 

अशा काही हिरव्या आणि पालेभाज्या (Palebhajya) आहेत, ज्यांच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. जर तुम्हालाही या भाज्यांची लागवड करायची असेल, तर राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या (National Seed Corporation) वेबसाईटवर बियाणे विक्री सुरु आहे. येथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बियाणे खरेदी करून लागवड करू शकता. 

येथून भाजीपाला बियाणे खरेदी करा

परसबाग आणि भाजीपाला लागवडीची वाढती मागणी लक्षात घेता, राष्ट्रीय बियाणे महामंडळ शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उन्हाळ्यात पेरणी करायच्या पालेभाज्यांचे बियाणे किट ऑनलाइन विकत आहे. तुम्ही हे बियाणे राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकता. या किटमध्ये तुम्हाला ५ हिरव्या पालेभाज्यांचे बियाणे मिळतील. याशिवाय, शेतकऱ्यांना येथे इतर अनेक प्रकारच्या पिकांचे बियाणे सहज मिळतील. शेतकरी ते ऑनलाइन ऑर्डर करू शकतात.  

पालेभाज्यांची शेती हिरव्या पालेभाज्या खायला सर्वांनाच आवडतात. म्हणूनच वर्षभर बाजारात पालेभाज्या मिळत असतात. शिवाय शेतकरी देखील भाजीपाला लागवडीला प्राधान्य देतात. राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या माध्यमातून मेथी, पालक, मुळा आणि इतर हिरव्या भाज्यांची बियाणे विक्री करत आहे. येथील बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना सोयीस्कर ठरणार आहे.  बियाणे पाकिटांची किंमत जाणून घ्याकोणत्या हंगामात कोणत्या भाजीपाल्याचे बियाणे लावावे, याबद्दल सहसा लोकांना खूप समस्या येतात. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय बियाणे महामंडळ उन्हाळ्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हिरव्या पालेभाज्यांचे बियाणे विकत आहे. यामध्ये ५ हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे. हे सर्व ५ भाजीपाला बियाणे कीट सध्या ४३ टक्के सवलतीत उपलब्ध आहेत, २५ ग्रॅमच्या पॅकेट फक्त ४५. रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 

टॅग्स :भाज्यापीक व्यवस्थापनशेती