Urea DAP Shortage : मध्य-पूर्व आशियातील वाढत्या तणावाचा फटका आता कृषी क्षेत्रालाही बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जागतिक खत पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने युरिया व डीएपी खतांच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली असून, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.(Urea DAP Shortage)
बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामासाठी सुमारे १ लाख ७५ हजार मेट्रिक टन खताची मागणी केली जाते. मात्र, यंदा जागतिक परिस्थितीमुळे प्रत्यक्षात किती खत उपलब्ध होईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेती नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Urea DAP Shortage)
आयातीवर मोठे अवलंबित्व
भारत मोठ्या प्रमाणावर युरिया, डीएपी व पोटॅश खतांसाठी आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः रशिया आणि बेलारूस हे प्रमुख निर्यातदार देश असून, युद्धजन्य परिस्थितीमुळे या देशांकडून होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
याशिवाय, समुद्री मार्गांमध्ये बदल व वाढलेला वाहतूक खर्च यामुळे खत भारतात पोहोचण्यास उशीर होत आहे.
खतांच्या किमती वाढण्याची शक्यता
जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी प्रतिमेट्रिक टन दर ५० टक्क्यांपर्यंत वाढले असल्याची नोंद आहे.
खरीप हंगामात खतांची मागणी सर्वाधिक असते. अशा वेळी वाढती किंमत आणि संभाव्य टंचाई यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
मागणी-आवंटनातील तफावत
२०२५ साठी खतांचे १,८५,४८७ मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष मागणी १,७१,६०० मेट्रिक टन इतकी आहे.
मात्र, यंदा जागतिक परिस्थिती पाहता हे आवंटन पूर्णपणे उपलब्ध होईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
महिनाभरात वाढणार मागणी
सध्या बाजारात खतांची मागणी मर्यादित असली तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून खरीपपूर्व तयारीला सुरुवात होताच मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी आगाऊ खत साठवण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे पुरवठ्यावर ताण वाढू शकतो.
सध्या स्थिती स्थिर, पण धोका कायम
सध्या बाजारात युरिया व डीएपी खतांची उपलब्धता समाधानकारक असल्याचे चित्र आहे. मात्र, जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे, समुद्री वाहतुकीतील विलंब आणि साठा व्यवस्थापन यावर पुढील परिस्थिती अवलंबून राहणार आहे.
तज्ज्ञांचा सल्ला
तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी खतांचा वापर नियोजनबद्ध आणि काटकसरीने करणे गरजेचे आहे. तसेच, सरकारने वेळेत पुरवठा सुनिश्चित करून साठा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडींवर सतत लक्ष ठेवून योग्य निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मध्य-पूर्वेतील तणावाचा परिणाम आता थेट भारतीय शेतीवर होण्याची शक्यता असून, खरीप हंगामाच्या तोंडावर खत टंचाईचे सावट गडद होताना दिसत आहे.
अधिक वाचा : Soil Fertility : अन्नच विषारी बनतेय! शेतीतल्या 'या' मोठ्या चुकीमुळे वाढतोय धोका
Web Summary : Middle East tensions threaten India's fertilizer supply, potentially impacting the upcoming Kharif season. Dependence on imports, especially from Russia and Belarus, exacerbates the situation. Rising global prices and logistical delays add to farmers' worries about urea and DAP availability and affordability.
Web Summary : मध्य पूर्व में तनाव से भारत की उर्वरक आपूर्ति खतरे में है, जिससे आगामी खरीफ सीजन प्रभावित हो सकता है। रूस और बेलारूस से आयात पर निर्भरता स्थिति को और बढ़ाती है। बढ़ती वैश्विक कीमतें और लॉजिस्टिक देरी से यूरिया और डीएपी की उपलब्धता और सामर्थ्य के बारे में किसानों की चिंता बढ़ रही है।