Join us

Unseasonal Rain Impact On Crops : अतिवृष्टीनंतर अवकाळीचा कहर; हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:46 IST

Unseasonal Rain Impact On Crops : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा तिहेरी फटका बसला आहे. आधी अतिवृष्टी, आता अवकाळी पावसाने सोयाबीन आणि कापसाचे उरलेसुरले पीकही पाण्यात गेलं. शेतात कोंब फुटलेल्या सोयाबीनच्या शेंगा आणि काळवंडलेल्या कापसाच्या वाती पाहून शेतकरी अक्षरशः कोसळले आहेत. (Unseasonal Rain Impact On Crops)

सोमनाथ खताळ 

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान केले होते. नुकतेच पिके सावरू लागली असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा कहर माजवला आहे.  (Unseasonal Rain Impact On Crops)

गेल्या दोन दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे सव्वासात हजार हेक्टरवरील शेती पाण्यात आली आहे.(Unseasonal Rain Impact On Crops)

कापसाच्या वाती, सोयाबीनला कोंब

अवकाळी पावसामुळे वेचणीस आलेल्या कापसाचे पिक ओले होऊन काळे पडले आहे. पावसाच्या पाण्यात कापसाच्या टोप्या कुजून वाती होऊ लागल्या आहेत.

तर दुसरीकडे, शेतात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या शेंगांमध्येच कोंब फुटू लागले आहेत.

शेतकरी सांगत आहेत की, “आधी अतिवृष्टीने नाश झाला, आता अवकाळीने उरलेसुरले पीकही बुडाले. आम्ही जगावं की मरावं?”

सप्टेंबरमध्येच झाली होती हानी

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

पिकांचे नुकसान 

पिकांचा प्रकारनुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिरायत पिके६,९३,८१०.३४
बागायत पिके१०,९९४.७७
फळपिके१६,२६८.७६

१३ महसूल मंडळांत अतिवृष्टी

मंगळवारी रात्री जिल्ह्यातील १३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. पाटोदा, ममदापूर, लोखंडी सावरगाव, घाटनांदूर, बर्दापूर, उजणी, राडी, बनसारोळा, होळ, परळी, धर्मापुरी, नागापूर आणि धारूर या मंडळांत पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

५४४ कोटींच्या मदतीत 'ई-केवायसी'ची अडचण

शासनाने बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५४४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली असली, तरी अनेकांना ती अद्याप मिळालेली नाही.अनेक शेतकऱ्यांची मदत 'ई-केवायसी' प्रक्रियेत अडकली आहे. परिणामी, दिवाळीसारख्या सणालाही अनेकांच्या घरात अंधारच होता.

काही मंत्री, आमदार आणि खासदारांनी केवळ औपचारिक पाहणी केली, प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतात गेले नाहीत. राजकीय नेत्यांकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचा प्रश्न  “आम्ही संकटात आहोत, पण आमच्या वेदनेला आवाज कोण देणार?”

बीड जिल्ह्यात ८.५ लाखांहून अधिक शेतकरी संकटात

सव्वासात हजार हेक्टरवरील शेती पाण्यात

कापसाचे नुकसान: वाती झालेल्या बोंडांमुळे उत्पादन घट

सोयाबीनची शेंग फुटल्याने बाजारात दर्जेदार मालाची टंचाई

शासन मदत थांबलेली, ई-केवायसी अडथळा ठरत आहे

अवकाळी आणि अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. एकीकडे पीक नष्ट, दुसरीकडे मदत विलंब या दुहेरी आघाडीवर शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. तातडीने नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tomato Market : पावसाने टोमॅटोची 'लाली' फिकी; भाव घसरले अर्ध्यावर!

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rain Ruins Crops in Beed, Farmers Face Heavy Losses

Web Summary : Beed farmers face ruin as unseasonal rains damage cotton and sprout soybean. Over 8.5 lakh farmers are in distress. Government aid delayed, adding to woes. Representatives silent on crisis.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकसोयाबीनकापूसबीड